मुंबई : माजी क्रिकेट संजय मांजरेकर याची आत्मकथा असलेल्या ‘इम्परफेक्ट’ पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी त्याने करिअरसंबंधी अनेक गुपितांवरून पडदा उठवला. त्याने सांगितले की, तो त्याच्या वडीलांना खूप घाबरायचा.
संजयने सांगितले की, ‘ज्याप्रकारे ते(वडील विजय मांजरेकर) माझ्याशी वागले त्याचा क्रिकेटर म्हणून यश मिळवण्यात मला चांगलाच फायदा झाला. मला आनंद आहे की, माझ्या दोन्ही मुलांचं क्रिकेटशी काही देणंघेणं नाहीये. आणि मी त्यांना त्यांचं करिअर स्वत: निवडण्याची सूट दिलीये’.
त्याने यावेळी मान्य केलंय की, राहुल द्रविद आणि सौरव गांगुलीच्या येण्यामुळे मधल्या फळीतील स्पर्धा वाढली आणि त्यामुळे त्याने सन्यास घेण्याच्या निर्णय घेतला. टीममध्ये वापसी करण्यासाठी रणजी ट्रॉफीच्या कठिण परीक्षेतून जायचे नव्हते’.
यावेळी संजय मांजरेकर याला विचारण्यात आले की, कोणत्या कर्णधाराने सर्वाधिक प्रभावित केले. यावर त्याने जराही वेळ न घालवता इमरान खान याचं नाव घेतलं. तो म्हणाला की, ‘मी इमरान खानचा मोठा प्रशंसक आहे. मला त्याच्या नेतृत्वात खेळणं आवडलं असतं. टीम इंडियातील महेंद्र सिंग धोनी मला पसंत होता. तसेच मला सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातही खेळणे आवडेल. तो असा कर्णधार आहे ज्याला पराभवाची चिड आहे’.
संजय मांजरेकर याने त्याच्या करिअरमध्ये ३७ टेस्ट सामने खेळले आणि २०४३ रन्स केलेत. त्याचा सर्वाधिक स्कोर २१८ रन्स आहे. हा स्कोर त्याने पाकिस्तान विरोधात १९८९ मध्ये केला होता.