दुबई : आयसीसी (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने आज मोठी महत्त्वाची घोषणा केली आहे. आयसीसीने 2024 ते 2031 दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं (Icc World Cup) आणि यजमान देशाच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक संघांना पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. (Icc announced 2024 to 2031 events india will host t20 world cup 2026 champion trophy 2029 and 2031 one day world cup)
अमेरिकेत पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप
यूएएस आणि नामिबियाला (USA and Namibia) पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. अमेरिकेत क्रिकेटचा इतका प्रचार झालेला नाही. मात्र त्यानंतरही अमेरिकाला ही संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत 2024 चा टी 20 वर्ल्ड कप होणार असल्याची चर्चा होती. अमेरिका आणि वेस्टइंडिज हे दोन्ही संघ या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करणार आहेत. यूएसए (USA Cricket) आणि वेस्टइंडिज क्रिकेट (Cricket West Indies) बोर्डासाठी ही महत्त्वाची बाब आहे.
भारतात 3 मोठ्या स्पर्धा
आयसीसीने भारतात 2024 ते 2031 या दरम्यान एकूण 3 स्पर्धांचं आयोजन केलं आहे. आयसीसीने भारतासह श्रीलंकेला 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या आयोजनाचा मान देण्यात आला आहे. तर 2029 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान टीम इंडियाकडेच आहे. वनडे वर्ल्ड कप 2031 स्पर्धेचं आयोजन भारत आणि बांगलादेश करणार आहेत. एकूणच भारतात टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला लॉटरी लागली आहे. आयसीसीने पाकिस्तानला 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजनाचा मान दिला आहे.
असं आहे वेळापत्रक
आयसीसीच्या माहितीनुसार, टी 20 वर्ल्ड कप 2024 आणि 2026, वर्ल्ड कप 2027, टी 20 वर्ल्ड कप 2028, टी 20 वर्ल्ड कप 2030 आणि वर्ल्ड कप 2031 या स्पर्धांमध्ये एकापेक्षा अधिक यजमान देश असणार आहेत. थोडक्यात काय तर या स्पर्धांचं आयोजन हे एकापेक्षा अधिक देश करणार आहेत.
वर्ल्ड कप आणि यजमान देश
टी 20 वर्ल्ड कप 2024 - वेस्टइंडिज आणि अमेरिका.
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी - पाकिस्तान.
टी 20 वर्ल्ड कप 2026 - भारत आणि श्रीलंका.
वर्ल्ड कप 2027 - दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया.
टी 20 वर्ल्ड कप 2028 - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2029 - भारत
टी 20 वर्ल्ड कप 2030 - इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड
वर्ल्ड कप 2031 - भारत आणि बांगलादेश
Are you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket?
Eight new tournaments announced
14 different host nations confirmed
Champions Trophy officially returns https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92F— ICC (@ICC) November 16, 2021