ICC च्या 'या' निर्णयामुळे टीम इंडीयाला नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा

आईसीसी (ICC) ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  (World Test Championship) च्या अंकतालिकेच्या नियमात बदल केलाय. 

Updated: Nov 20, 2020, 06:40 PM IST
ICC च्या 'या' निर्णयामुळे टीम इंडीयाला नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (World Test Championship) बदल होण्याची शक्यता होती. पण आयसीसी (ICC) ने यावर स्पष्टीकरण दिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसंदर्भात मोठा निर्णय सुनावलाय. आईसीसी (ICC) ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  (World Test Championship) च्या अंकतालिकेच्या नियमात बदल केलाय. ज्यामुळे टीम इंडीयाचे मोठे नुकसान झालंय. 

आयसीसी  (ICC) नियमांमध्ये मध्ये बदल करण्याआधी टीम इंडीया नंबर १ वर होती. पण आता १ नंबरवरुन दुसऱ्या स्थानी आलीय. तर दुसऱ्या स्थानावर असलेली ऑस्ट्रेलिया रॅंकींगमध्ये नंबर १ वर गेलीय. 

टीम्सना मॅचमध्ये मिळालेल्या विजयांच्या आधारे ही सरासरी काढण्यात आली. कोरोना संकटात ज्या सिरीज खेळल्या गेल्या नाहीत त्या ड्रॉ मानल्या गेल्यायत. आयसीसीच्या या नियमाचा ऑस्ट्रेलियाला खूप फायदा झालाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

चार सिरीजमध्ये टीम इंडीयाचे एकूण ३६० गुण असून ती टॉपवर आहे. पण नव्या नियमांनुसार सरासरीच्या आधारे दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे तीन सिरीजमध्ये २९६ पॉईंट्स होते आणि आता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी पोहोचलीय.