मुंबई : आयसीसीने (ICC) बुधवारी 30 नोव्हेंबरला वनडे रँकिंग (Icc Odi Ranking) जाहीर केलीय. या रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना मोठा फटका बसलाय. शिखर धवन (Shikhar Dhawan) न्यूझीलंड दौऱ्यातील (India Tour Of New Zealand 2022) एकदिवसीय मालिकेतील कर्णधार होता. धवनला रँकिगमध्ये मोठं नुकसान झालंय. त्याशिवाय रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांचीही घसरण झालीय. या दोन्ही अनुभवी फलंदाजांचा समावेश न्यूझीलंड दौऱ्यात नव्हता. दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती. या दोघांची विश्रांतीमुळे पिछेहाट झालीय. (icc odi rankings big lost team india rohit sharma shikhar dhawan jasprit bumrah after series lost against new zealand)
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका न्यूझीलंडने 1-0 अशा फरकाने जिंकली. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे न्यूझीलंडचा विजय झाला. धवनने या मालिकेतील 3 सामन्यात एकूण 103 धावा केल्या. यामुळे धवनला 2 स्थानांचं नुकसान झालंय. धवनची आता 15 व्या स्थानी घसरण झालीय.
रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत रोहित आणि विराट या दोघांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. या दोघांना प्रत्येकी 1 स्थानांचं नुकसान झालंय. विराट 8 व्या तर रोहितची 9 व्या स्थानी घसरण झालीय. या दोघांना इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मागे टाकलंय. बेयरस्टोने थेट 7 व्या स्थानी उडी घेतलीय. तर न्यूझीलंड विरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलला 2 स्थानांचा फायदा झालाय. त्यामुळे गिल 34 व्या स्थानी पोहचलाय. तर श्रेयस अय्यर 27 व्या स्थानी आहे. अव्वल स्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानी कायम आहे.
गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. जसप्ती बुमराह, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला या तिकडीला प्रत्येकी 2 स्थानांचं नुकसान झालंय. बुमराह 14, चहल 23 आणि कुलदीप 26 व्या स्थानी आहे. तर जाडेजाची दुखापतीमुळे 4 स्थानाने नुकसान होऊन 57 व्या क्रमांकावर घसरण झालीय.
RWA
(20 ov) 125/5
|
VS |
BRN
126/3(18.1 ov)
|
Bahrain beat Rwanda by 7 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 139/7
|
VS |
BRN
140/1(15.1 ov)
|
Bahrain beat Malawi by 9 wickets | ||
Full Scorecard → |
QAT
(20 ov) 189/4
|
VS |
SDA
193/6(19.2 ov)
|
Saudi Arabia beat Qatar by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.