पाकिस्तानात 30 वर्षानंतर ICC ने आयोजित केली ही स्पर्धा, टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?

पाकिस्तानात ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीचं आय़ोजन केलं आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? हा मोठा प्रश्न आहे.

Updated: Nov 16, 2021, 08:56 PM IST
पाकिस्तानात 30 वर्षानंतर ICC ने आयोजित केली ही स्पर्धा, टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? title=

दुबई : ICC ने पुढील 10 वर्षातील सर्व प्रमुख स्पर्धांचे आयोजक जाहीर केले आहेत. खास बाब म्हणजे पाकिस्तान जवळपास 3 दशकांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (icc champions trophy 2025 in Pakistan) 

पाकिस्तानात चॅम्पियन ट्रॉफी होत असल्याने टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? हा मोठा प्रश्न आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने पाकिस्तान (Indis vs Pakistan) सोबत सीरीजचं आयोजन करणं काही वर्षांआधीच बंद केलं आहे. आयपीएल सारख्या जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये ही पाकिस्तानच्या खेळाडूंना घेतलं जात नाही.

पाकिस्तानात सुरक्षेचा मोठा मुद्दा आहे. पाकिस्तानात खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानात होईल का? याबाबत ही शंका आहे.

1996 नंतर म्हणजेच 29 वर्षांनंतर पहिल्यांदाच ICC स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. 1996 मध्ये पाकिस्तानने भारत आणि श्रीलंकेसोबत मिळून 50 षटकांचा विश्वचषक आयोजित केला होता. श्रीलंकेने हा विश्वचषक जिंकला.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात 2024 टी-20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. अमेरिकेत प्रथमच क्रिकेटचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तर 2026 चा T20 विश्वचषक भारतात होणार आहे.

केव्हा आणि कुठे, कोणती आयसीसी स्पर्धा

• जून 2024 T20 विश्वचषक – अमेरिका, वेस्ट इंडिज
• फेब्रुवारी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी - पाकिस्तान
• फेब्रुवारी 2026 T20 विश्वचषक - भारत, श्रीलंका
• ऑक्टोबर 2027 50 षटकांचा विश्वचषक - दक्षिण आफ्रिका, नामिबिया, दक्षिण आफ्रिका
• ऑक्टोबर 2028 T20 विश्वचषक - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड
• ऑक्टोबर 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी - भारत
• जून 2030 T20 विश्वचषक - इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड
• ऑक्टोबर 2031 - 50 षटकांचा विश्वचषक - भारत, बांगलादेश

अलीकडेच ICC T20 world cup 2021 संपला आहे, ज्याचा अधिकृत यजमान भारत होता. मात्र, कोरोनामुळे त्याचं आयोजन यूएई आणि ओमानमध्ये करण्यात आले. तर 2022 टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. जर आपण 2023 च्या 50 षटकांच्या विश्वचषकाबद्दल बोललो तर तो भारतातच होणार आहे.

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 2022 ते 2031 दरम्यान एकूण 5 टी-20 विश्वचषक होणार आहेत. आयसीसीने याआधीच दर दोन वर्षांनी टी-20 विश्वचषकाबाबत बोलले होते, तर 50 षटकांचा विश्वचषक चार वर्षांतून एकदाच आयोजित करण्यात आला आहे.