टी-२० रॅंकिंगमध्ये विराट अव्वल, बुमराह दुस-या स्थानावर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टी-२० फलंदाजांच्या आयसीसी रॅंकिंग यादीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गोलंदाजांच्या यादीत दुस-या क्रमांकावर उडी घेतली आहे.

Updated: Sep 18, 2017, 08:55 AM IST
टी-२० रॅंकिंगमध्ये विराट अव्वल, बुमराह दुस-या स्थानावर  title=

दुबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टी-२० फलंदाजांच्या आयसीसी रॅंकिंग यादीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गोलंदाजांच्या यादीत दुस-या क्रमांकावर उडी घेतली आहे.

कोहली हा या यादीत दुस-या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरोन फिंचच्या ३९ अंकाने पुढे आहे. तर वेस्टइंडिजचा इविन लुई हा तिस-या स्थानावर आहे.   

लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या इंडिपेंडस कप सीरिजमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज ठरलेला पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम २१व्या स्थानावरून उडी घेत सहाव्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांच्या यादीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या इमरान ताहीरला मागे सारत दुस-या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. या यादीत पाकिस्तानचा इमाद वसीम हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन हा १०व्या स्थानावर कायम आहे.  

वेस्टइंडिजने नुकतीच इंग्लंडला २१ रन्सने मात दिल्यानंतर टीम इंडिया रॅंकींगमध्ये पावच्या स्थानावर कायम आहे. वेस्टइंडिज टीम नुकत्याचा झालेल्या सामन्याआधी ११७ अंकाने चौथ्या स्थानावर होती. पण आता त्यांचे अंक १२० झाले आहेत, त्यामुळे ते तिस-या स्थानावर आले आहेत. दुसरीकडे इंग्लंडने चार अंक गमावल्याने ते ११९ अंकांसोबत दुस-या स्थानावरून चौथ्या स्थानावर आले आहेत.