ICC T20 world cup : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC T20 world cup) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्धच्या सामन्यांनी प्रवासाची सुरुवात करणार आहेत. भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर (melbourne cricket ground) आमनेसामने येणार आहेत. टी-20 विश्वचषक 2021 च्या कटू आठवणी विसरून भारतीय संघाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतले आहे. मेलबर्नला पोहोचल्यानंतर रोहित फलंदाजीच्या सरावात डाव्या आणि उजव्या जलद थ्रो-डाउन थ्रोर्सचा सामना करत आहे. रोहितसह भारताच्या आघाडीचा फलंदाज विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) जोरदार प्रॅक्टिस करत आहे.
मात्र फलंदाजीच्या सरावादरम्यान विराट कोहली नेटच्या (Net Practice) मागे बसलेल्या चाहत्यांच्या कमेंट्समुळे खूपच नाराज दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहलीने या चाहत्यांना इशारा दिला आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये, भारताला 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली चाहत्यांना आवाज न करण्याचे आवाहन करतो. पण यानंतरही चाहते ऐकत नाही, तेव्हा विराट ज्या पद्धतीने बॅटने चेंडू मारतो, त्यावरून त्याची चीड पाहायला मिळत आहे.
During the practice Virat Kohli calmly said something like this to the fans .@imVkohli pic.twitter.com/3X5LnNTQsV
— Hemant Singh (@Hemant18327) October 20, 2022
या व्हिडिओमध्ये विराट नेटवर शॉट खेळताच चाहते मागून ओरडत आणि हसत असल्याचे ऐकू येत आहेत. यावेळी विराट मागे वळून म्हणतो, 'यार, सरावाच्या वेळी बोलू नका. लक्ष विचलित होते. यावर चाहते, ठीक आहे भाऊ, तुम्ही आराम कराल तेव्हा बोलू. भाऊ, मग आमचे लोक किंग कोहलीच्या बाजूने बोलतील. किंग तर एकच आहे... असे आवाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सतत ऐकू येतील.