महिला टी-२० वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी

महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या आहेत.

Updated: Mar 5, 2020, 05:29 PM IST
महिला टी-२० वर्ल्ड कप : फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी

सिडनी : महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये टी-२० वर्ल्ड कप फायनल होणार आहे. रविवार ८ मार्चला ही फायनल रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्येही पावसाने व्यत्यय आणला.

ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग करुन २० ओव्हरमध्ये १३४/५ एवढा स्कोअर केला. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला १३ ओव्हरमध्ये ९८ रनचं आव्हान मिळालं. पण आफ्रिकेला ९२/५ पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा ५ रननी विजय झाला.

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलआधी याच मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिली सेमी फायनल मॅच झाली होती. पण पावसामुळे एकही बॉल न टाकता ही मॅच रद्द झाली. पण साखळी फेरीत सर्वाधिक सामने जिंकल्यामुळे भारताचा फायनलमध्ये प्रवेश झाला.

वर्ल्ड कपच्या अ गटात असलेल्या भारताने आतापर्यंत आपल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली होती. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते.