World Cup Complete Schedule: एका क्लिकवर जाणून घ्या वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्याची वेळ, तारीख अन् ठिकाण

All You Need To Know About ICC Cricket World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभ अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सर्धेचं बिगूल वाजलंय. आजपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. सलामीच्या सामन्यात गतविजेती इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंडचा संघ आमने सामने असेल. 

राजीव कासले | Updated: Oct 5, 2023, 01:03 PM IST
World Cup Complete Schedule: एका क्लिकवर जाणून घ्या वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्याची वेळ, तारीख अन् ठिकाण title=

ICC Cricket World Cup 2023: जगभरातील करोडो क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण अखेर आलाय. क्रिकेटचा महाकुंभ अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय.   5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) रंगणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धा एकाच देशात खेळवली जात आहे यंदा भारतात (India) ही स्पर्धाहोणार असून यासाठी 10 स्टेडिअम सज्ज झालीत. याआधी 1987, 1996 आणि 2011 विश्वचषक स्पर्धेचं संयुक्त यजमानपद भारताने भूषवलं आहे. 

सलामीचा सामना
गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदम्यानच्या (England vs New Zealand) सामन्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. यजमान भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. तर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर टीम इंडिया (India vs Pakistan) दोन हात करेल. 

अहमदाबादमध्ये अंतिम सामना
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे . तर मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम आणि कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअवर सेमीफायनलचे सामने रंगतील. यंदाची विश्वचषक स्पर्धा ही राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेले सर्व 10 संघ एकमेकांविरोधात खेळतील. या स्पर्धेत एकूण सेमीफायनल आणि फायनल धरून 48 सामने होणार आहेत. राऊंड रॉबिनमधले टॉपचे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करताली. पहिली सेमीफायनल 15 नोव्हेंबर मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर तर दुसरी सेमीपायनल 16 सेमीफायनल नोव्हेंबराल कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवली जाणार आहे. 

याआधी 2011 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळवला गेला होता. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत 28 वर्षांनंतर विश्वचषचक स्पर्धेवर नाव कोरलं आहेत.

केव्हा असणार रिझर्व्ह डे?
15 आणि 16 नोव्हेंबरला सेमीफायनलचे सामने खेळवले जाणार असून दोनही सेमीफायनलसाटी एक रिझर्व्ह डे ठेवला जाणार आहे. 19 नोव्हेंबरला अंतिम सामना असेल, तर 20 नोव्हेंबरला रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. स्पर्धेतील जास्त सामने डे-नाईट खेळवले जाणार आहेत. तर सहा सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरु होतील. 

या मैदानांवर सामने
विश्वचषक स्पर्धेचे सर्व सामने भारतातल्या 10 स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. यात हैदराबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई, धरमशाला, कोलकाता या स्टेडिअमचा समावेश आहे.

स्पर्धेतील दहा संघ
यंदाच्या स्पर्धेत दहा संघ खेळणार आहेत. यजमान असल्याने भारतीय क्रिकेट संघाला स्पर्धेत थेट प्रवेश मिळालाय. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाने 2020.23 आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगच्या माध्यमातून विश्वचषक स्पर्धेत जागा मिळवलीय. तर श्रीलंका आणि नेदरलँड संघाने क्वालिफाय स्पर्धेतून प्रवेश मिळवला आहे. पहिल्यांदा वेस्टइंडिजचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 

भारतीय सँघाचा वेळापत्रक

8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई 
11 ऑक्टोबर   vs अफगाणिस्तान  दिल्ली
14 ऑक्टोबर  vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर  vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर  vs न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर vs नेदरलँड्स , बंगळुरु