ICC World Cup Team India : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. रोहित शर्माच्या (Rohti Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) आतापर्यंत 7 सामने खेळली असून सातही सामन्यात विजय मिळवलाय. टीम इंडियाच्या खात्यात 14 पॉईंट जमा झाले असून सेमीफायनलमधलं स्थानही निश्चित झालं आहे. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 302 धावांना बलाढ्य विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाचे हिरो होते, भारताचे वेगवान गोलंदाज. मोहम्मद शमी (Mohammad Shami), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या वेगवान त्रिकुटाने तब्बल 9 विकेट घेतल्या. यात शमीने 5, सिराजने 3 आणि बुमराहने एक विकेट घेतल्या.
केवळ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातच नाही तर या संपूर्ण स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी जबरदस्त होतेय. विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात शमीने तब्बल 14 विकेट घेतल्यात आहेत. यात दोनदा पाच विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. तर जसप्रीत बुमराहने सात सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद सिराजने सात सामन्यात नऊ विकेट घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजांसमोर एकाही संघांचे खेळाडू मैदानावर टीकाव धरू शकत नाहीए. भारतीय संघाच्या याच दमदार कामगिरीवर आता काही जणांकडून आक्षेप घेतला जातोय.
चौकशी करण्याची मागणी
पाकिस्तानचे दिग्गज माजी क्रिकेटपटू हसन रजा यांनी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला देण्यात आलेल्या चेंडूची चौकशी करावी अशी मागमी केली आहे. पाकिस्तानमधल्या एका न्यूज चॅनलेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. या कार्यक्रमात अँकरने हसन रजा यांना प्रश्न विचारला. गोलंदाजांना दिला जाणा चेंडू वेगवेगळ्या प्रकारचा असतो का? ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाज खेळपट्टीवर चेंडू स्विंग करतायत, त्यांना स्विंग होणारा चेंडू देण्यात आला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना हसन रजा यांनी बेताल वक्तव्य केलं. डीआरएसचे निर्णयही जाणूनबुजून टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या बाजूने दिले जातात. सात ते आठ DRS चे निर्णय असे होते जे संशयास्पद होते असं हसन रजा यांनी म्हटलं आहे. तसंच शमी आणि सिराज अॅलन डोनाल्ड, एनटिनीसारखे धोकादायक गोलंदाज बनलेत. सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना जास्त स्विंग होणारा चेंडू दिला जात असावा, त्या चेंडूची चौकशी होणं गरजेचं आहे, असा आरोपही हसनज रजा यांनी केली आहे.
हसन रजाला भारतीय क्रिकेटरचं उत्तर
हसन रजाच्या या आरोपांनी क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. पण याला भारतीय क्रिकेटर आकाश चोपडाने जशासतसं उत्तर दिलं आहे. आकाश चोप्राने हसन रजाची मुलाखत एक विनोदी कार्यक्रम होता असं सागंत त्यांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे.