निडास ट्रॉफी: मोबाईलवर 'या' ठिकाणी पाहू शकाल Live मॅच

श्रीलंकेत ६ मार्चपासून निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 5, 2018, 11:18 PM IST
निडास ट्रॉफी: मोबाईलवर 'या' ठिकाणी पाहू शकाल Live मॅच title=

मुंबई : श्रीलंकेत ६ मार्चपासून निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

भारतामध्ये क्रिकेटप्रेमी जिओ टीव्हीवर या मॅचेसचं प्रक्षेपण पाहू शकणार आहेत. यापूर्वीही जिओ टीव्हीवर ईएफएल कप (कोरोबो कप फायनल) चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

क्रिकेट श्रीलंकासोबत करार

जिओ टीव्हीने निडास ट्रॉफीचं भारतात डिजिटल प्रक्षेपण करता यावं यासाठी क्रिकेट श्रीलंकासोबत करार केला आहे.

अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

जिओ टीव्हीने म्हटलयं की, टी-२० ट्रायसीरिजच्या प्रक्षेपणासाठी क्रिकेट श्रीलंकासोबत करार झाला आहे. क्रिकेट श्रीलंकाच्या जेरोम जयारत्ने यांनी सांगितले की, ही ट्रायसीरिज भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिओ टीव्ही समर्थ आहे. तसेच, जिओ टीव्हीच्या माध्यमातून ही सीरिज अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

पहिली मॅच या टीममध्ये

निडास ट्रॉफीत पहिली मॅच ६ मार्च रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. श्रीलंकेत होणारी ही मॅच भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होईल. सर्व मॅचेस या श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअममध्ये खेळल्या जाणार आहेत.

या सीरिजमध्ये कॅप्टन विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी यांच्यासोबत इतरही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ६ मार्चपासून टूर्नामेंटला सुरुवात होणार आहे तर शेवटची मॅच १८ मार्च रोजी खेळली जाणार आहे.

टी-२० ट्रायसीरिजचं वेळापत्रक

६ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका

८ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश

१० मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश

१२ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका

१४ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश

१६ मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश

१८ मार्च- फायनल