IND vs AUS 2nd T20I : टीम इंडियासमोर विजयासाठी इतक्या धावांचे आव्हान

टीम इंडियाला विजयासाठी इतक्या धावांची गरज, 'करो या मरो'चा सामना जिंकणार का?

Updated: Sep 23, 2022, 10:22 PM IST
 IND vs AUS 2nd T20I : टीम इंडियासमोर विजयासाठी इतक्या धावांचे आव्हान title=

मुंबई : दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने आठ ओव्हरमध्ये 90 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियासमोर 91 धावांचे आव्हान असणार आहे. टीम इंडिया ही धावसंख्या पुर्ण करून मालिकेत आघाडी घेतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

तीन टी20 मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट होते. त्यामुळे सामना सुरू होण्यास खुपच उशीर झाला. 7 वाजता सुरु होणारा सामना 9 वाजता सुरु झाला. आऊटफिल्ड ओली असल्याने इतका उशीर झाला होता.एका वेळेस असे वाटत होते की सामना रद्द होईल, मात्र नंतर सामना 8-8 ओव्हर्सचा खेळवण्याचा निर्णय झाला. 

कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया प्रथम बॅटींगला उतरली होती. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कॅमरन 5 धावावर आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेल भोपळाही फोडू शकला नाही. तर डेविडने 2 धावा केल्या. त्याच्यानंतर मैदानात आलेल्या मॅथ्यू वाडे आणि फिंचने डाव सावरला. फिंचने 31 धावा केल्या. मॅथ्यू वाडेने 37 धावा केल्या आहेत या खेळीत 4 फोर आणि 2  सिक्सचा समावेश होता. या फिंच आणि वाडेच्या धावसंख्येच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 90 स्कोर उभारला होता.  टीम इंडियातून अक्षर पटेलने 2 विकेट घेतले तर बुमराहने 1 विकेट घेतला होता.

दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला 91 धावांची गरज आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेता येणार आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकते का ते पाहावे लागणार आहे.