अनफिट खेळाडूला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार नाही! शमीच्या तब्येतीबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma About Mohammad Shami  : बंगळुरू येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहितने मोहम्मद शमीच्या तब्येतीबाबत मोठे अपडेट्स दिले. 

पुजा पवार | Updated: Oct 15, 2024, 05:13 PM IST
अनफिट खेळाडूला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार नाही! शमीच्या तब्येतीबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य  title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Sharma About Mohammad Shami Health : न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजनंतर टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होईल यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळेल. बंगळुरू येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहितने मोहम्मद शमीच्या तब्येतीबाबत मोठे अपडेट्स दिले. 

काय म्हणाला रोहित शर्मा? 

मोहम्मद शमी दुखापतीमुळे भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर मैदानात दिसला नाही. शमीच्या पायावर सर्जरी झाली असून तो सध्या बंगळुरू येथील एनसीएमध्ये राहून रिकव्हर करत आहे. मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडियासोबत जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता याबाबत कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठी अपडेट दिली. तो म्हणाला, "प्रामाणिकपणे बोलू तर ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी त्यांची (मोहम्मद शमी) निवड होणे थोडे कठीण आहे. त्यांना अजून एक दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांच्या गुडघ्याला सूज आली होती. रिकव्हर होता होता त्यांची तब्येत पुन्हा खराब झाली त्यामुळे त्यांना पुन्हा सुरुवात करावी लागेल. ते डॉक्टर आणि फिजियो सोबत एनसीएमध्ये (नॅशनल क्रिकेट अकॅडमी, बंगळुरू) येथे आहेत. आम्ही अनफिट शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ इच्छित नाही. आम्ही आशा करतो की ते 100 टक्के बरे व्हावेत. 

हेही वाचा : IPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत

 

पुनरागमनापूर्वी शमीला खेळावे लागतील प्रॅक्टिस मॅच : 

मोहम्मद शमीने आतापर्यंत भारतासाठी 64 टेस्ट सामने खेळले असून यात 229 विकेट घेतले आहेत. यादरम्यान रोहितने सांगितले की, 'एनसीए कर्मचारी शमीच्या फिटनेसचे मूल्यांकन करत आहेत. या प्रक्रियेदरम्यान तो काही अंतर्गत सामनेही खेळू शकतो. हिटमॅन म्हणाला की, 'वेगवान गोलंदाजासाठी हे खूप कठीण आहे. कारण तो अनेक सामन्यांत खेळलेला नाही. आणि मग लगेचच तुमची सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कामगिरी करणे सोपे नाही. आम्ही त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणि 100 टक्के फिट होण्यासाठी पुरेसा वेळ देऊ इच्छितो. फिजिओ, ट्रेनर, डॉक्टरांनी त्याच्यासाठी रोडमॅप तयार केला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी काही प्रॅक्टिस सामने खेळावे लागतील'. 

हेही वाचा : IND VS NZ : सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यात

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिज: 

16 ते 20 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना एम. चेन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होईल. तसेच तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल. 

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप

राखीव खेळाडू -  हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा