हैदराबाद : ऑस़्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला आहे. 6 विकेट राखून टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने 9 वर्षानंतर मायदेशात ऑस़्ट्रेलियाविरूद्ध (austrailia) टी20 मालिका जिंकली आहे. टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) दृष्टीने टीम इंडियासाठी मोठा विजय आहे. (ind vs aus t20i team india won the t20 series after 9 years in india austrailia)
ऑस़्ट्रेलियाने (austrailia) प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 186 धावा केल्या आहेत. कॅमेरॉन ग्रीन आणि टीम डेविडच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस़्ट्रेलिया ही धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर (Team India) 187 धावांचे आव्हान होते.
सुर्यकुमार (Surykumar yadav) सुरूवातीपासून आतषबाजी करत होता. त्याने 36 बॉलमध्ये 69 धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीत त्याने 5 फोर आणि 5 सिक्स मारले. तर विराट कोहलीने (Virat Kohli) 48 बॉलमध्ये 63 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 फोर आणि 4 सिक्स मारले. विराट आणि सुर्यकुमार आऊट झाल्यानंतर टीम इंडिया सामना गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हार्दीक पंड्या आणि कार्तिकने सामना जिंकून दिला. हार्दीक 16 बॉलमध्ये 15 धावा केल्या तर कार्तिकने 1 धावा केल्या.
टीम इंडियाने 6 विकेट आणि 1 बॉल राखत हा विजय मिळवला. टीम इंडियाचा (Team India) विजयाचा शिल्पकार हा विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) ठरला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली.
9 वर्षांनंतर मालिकेवर बाजी
टीम इंडियाने (Team India) शेवटची टी20 मालिका 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियासमोर आज पुन्हा मायदेशात मालिका विजयाचा योग जुळुन आला होता. त्यानुसार टीम इंडियाने (Team India) 2-1 ने मालिका खिषात घातली. आणि 9 वर्षांचा दुष्काळ संपवला.