बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध कानपुर येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 23, 2024, 06:52 PM IST
बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 2nd Team India Squad : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पार पडला. यात टीम इंडियाने 280 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. आता बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध कानपुर येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. 

बीसीसीआयने चेन्नईतील टेस्ट सामना जिंकल्यावर लगेचच बीसीसीआयने दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली. या टीममध्ये बीसीसीआयने कोणताही बदल केला नसून पहिल्या टेस्ट सामन्यात टीममध्ये संधी दिलेल्या सर्व खेळाडूंना दुसऱ्या टेस्टमध्येही संधी दिली आहे. 27 सप्टेंबर पासून कानपूरच्या स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. 

हेही वाचा : अश्विन ते ऋषभ पंत... टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो, बांगलादेशला फोडला घाम

 

दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ :  

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.