IND vs ENG 3rd ODI: हार्दिक पंड्या-चहलची भेदक गोलंदाजी, इंग्लंडला 259 धावांवर रोखलं

टीम इंडियासमोर आता 260 धावांचे लक्ष आहे. 

Updated: Jul 17, 2022, 07:34 PM IST
IND vs ENG 3rd ODI: हार्दिक पंड्या-चहलची भेदक गोलंदाजी, इंग्लंडला 259 धावांवर रोखलं title=

मँचेस्टर : टीम इंडिया विरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने 259 धावा ठोकल्या आहेत. जोस बटलरची अर्धशतकी खेळीच्या बळावर  इंग्लंडला ही धावसंख्या गाठता आली. त्यामुळे टीम इंडियासमोर आता 260 धावांचे लक्ष आहे. तर टीम इंडियातून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 4, चहलने 3, मोहम्मद सिराज 2, जडेजाने एक विकेट काढला आहे.  

कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंड़ियाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा टिकता आले नाही आणि एका मागून एक विकेट पडत गेले. त्यामुळे सुरुवातीलाच इंग्लंडला मोठे धक्के बसले. जॉनी बेस्ट्रो आणि जो रूट शुन्य रन्सवर आऊट झाले. जेसन रॉयने 41, बेन स्टोक्स 27, मोईन अली 34, लिविंस्टन 27, क्रेग ओवरटनने 32 धावा केल्या आहेत. जोस बटलरने एकाकी झूंज देत 60 धावा केल्या. या धावांच्या बळावर इंग्लंडने 259 धावा ठोकल्या आहेत. 

टीम इंडियाच्या खेळाडूंनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला 45 ओव्हरमध्ये 259 धावात ऑलआऊट केले.त्यामुळे टीम इंडियासमोर आता 260 धावांचे लक्ष आहे. टीम इंडियातून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 4, चहलने 3, मोहम्मद सिराज 2, जडेजाने एक विकेट काढला आहे.  

तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना जिंकूण कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.