Ind vs Eng: मालिकेवर विजय मिळवण्यासाठी कोहलीचा मास्टरप्लॅन, कुलदीप होणार आऊट?

फलंदाजीचा विचार करता कृणाल संघात टिकू शकतो मात्र गोलंदाजीसाठी त्याची कामगिरी विशेष राहिली नाही. 

Updated: Mar 27, 2021, 03:17 PM IST
Ind vs Eng: मालिकेवर विजय मिळवण्यासाठी कोहलीचा मास्टरप्लॅन, कुलदीप होणार आऊट? title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज सुरू आहे. तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये भारत आणि इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी केली आहे. तिसरा वन डे सामना जिंकणं भारतीय संघासमोर आव्हान आहे. तिसऱ्या वन डे सामन्यात काँटे की टक्कर असणार आहे. मालिका खिशात घालण्यासाठी कर्णधार विराट कोहली सध्या मास्टरप्लॅन करत आहे. 

प्लेइंग इलेवनचा विचार करायचा झाला तर दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा फिट झाल्यानं तो खेळला. तर श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. तिसऱ्या वन डे सामन्यासाठी एक मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गोलंदाजीत कुलदीप यादवने 8 षटकार गमावले, जे कोणत्याही भारतीय गोलंदाजापेक्षा जास्त आहेत. दुसर्‍या सामन्यात त्याने 84 आणि पहिल्या सामन्यात 64 धावा इंग्लंडच्या संघाला काढण्याची संधी दिली. कुलदीपची खराब गोलंदाजी कोहलीसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. 

तिसऱ्या वन डे सामन्याच्या प्लेइंग इलेवनसाठी  एकदिवसीय मालिकेत कुलदीप संघाबरोबर राहतो की चहलला त्याच्या जागी स्थान मिळू शकेल काय हे पाहणे बाकी आहे. त्याच वेळी, कृणालचीही कामगिरी विशेष न राहिल्यान लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही कदाचित संघात संधी दिली जाण्य़ाची शक्यता व्यक्त केली आहे. 

फलंदाजीचा विचार करता कृणाल संघात टिकू शकतो मात्र गोलंदाजीसाठी त्याची कामगिरी विशेष राहिली नाही. त्यामुळे त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णधार विराट कोहली सर्व शक्यता पडताळून पाहात आहे. प्लेइंग इलेवनमध्ये तिसऱ्या वन डेसाठी नेमकी कोणाला संधी मिळणार हे प्रत्यक्षात उद्याच समजू शकणार आहे.