IND vs ENG 5th Test Predicted Playing XI: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात धर्मशालेत 7 मार्चपासून म्हणजे उद्यापासून पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना होणार आहे. भारत या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. तर बेन स्टोक्सकडे इंग्लंडची सूत्रे आहेत. त्यातच भारतीय संघात उद्याच्या सामन्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यात प्लेइंग 11 कशी असेल ते जाणून घ्या...
भारतीय संघाने चौथ्या कसोटीतच इंग्लंडमधील 5 कसोटी सामन्यांची मालिका जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाला कसोटी सामना 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत भारतीय संघाला जास्त दडपण नाही, कारण भारतीय संघाने आधीच जेतेपद पटकावले आहे. मात्र जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडची स्थिती खूपच खराब झाली आहे. अशा परिस्थितीत इंग्लंड सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, या कारणास्तव रोहित शर्मा धर्मशाला कसोटी सामन्यात कोणताही धोका पत्करु इच्छित नाही.
तर दुसरीकडे रांची कसोटीत विश्रांती मिळालेल्या जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले असून तो प्लेइंग 11 मध्ये दिसणार आहे. धर्मशालामध्ये सध्या थंडी आहे, बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. अशा स्थितीत येथील हवामान इंग्लंडसाठी योग्य असून येथे ढगाळ वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर धर्मशाला खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना फारशी उपयुक्त ठरणार नाही. भारतीय संघ स्लो टर्नर विकेट्सची निवड करेल, जिथे त्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे फिरकीपटू खेळात टिकून राहतील. रिव्हर्स स्विंगमध्ये पारंगत असलेला जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज मारक ठरू शकतो. भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहला संधी देण्यासोबतच ती रजत पाटीदारचा हक्कलपट्टी होवू शकते.
आकाशदीप किंवा कुलदीप यादवच्या जागी जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होणार आहे. या मैदानावर कुलदीपने कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यातील त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. तर रजत पाटीदारच्या जागी देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळू शकते. अनुभवी रविचंद्रन अश्विन 100 कसोटी खेळणार आहे.
भारतीय संघाची प्लेंइग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल/रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघाची प्लेंइग 11
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन.