मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना सुरू आहे. तर दुसरीकडे महिला संघाचा इंग्लंड विरुद्ध सामना रंगला होता. या सामन्यामध्या शेफाली वर्मा आणि स्नेहा राणाने कमालीची कामगिरी केली. महिला क्रिकेट संघाचं जगभरात कौतुक होत आहे. महिला संघाने आपली जबरदस्त कामगिरी करत आता इंग्लंड टीमच्या हातून विजय खेचून आणत सामना ड्रॉ केला.
स्नेहा राणाने 80 तर तानिया भाटियाने 44 नाबाद धावा केल्या. दोघींनी 99 धावांची भागीदारी करत सामना ड्रॉ केला. महिला क्रिकेट टीमने काउंटी ग्राऊंडवर केलेल्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड एकमेव सामना ड्रॉ केला आहे.
A brilliant contest between England and India in Bristol ends in a draw!
Sneh Rana top-scores for India in the second innings with a match-saving 80#ENGvIND scorecard: https://t.co/LBybzQLL9w pic.twitter.com/Yl0f8dsOxu
— ICC (@ICC) June 19, 2021
दुसर्या दिवशी इंग्लंडने पहिला डावात 9 बाद 396 धावा केल्या. तर भारताने पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 231धावा केल्या. इंग्लंडला 155 धावांची आघाडी मिळाली, इंग्लंडने भारताला फॉलऑन खेळण्यास भाग पाडले. पण फॉलोऑन काढून घेतल्यानंतर भारतीय संघानेही चांगली आघाडी घेतली महिला संघाने सामना ड्रॉ करत इंग्लंडला आपल्या बॅटिंगनं सडेतोड उत्तर दिलं.
स्नेहा राणाने 154 चेंडूमध्ये 13 चौकार ठोकले. भाटियाने 88 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले. शेफाली वर्माने डेब्यू करत अर्धशतकी खेळी केली. तिने 63 धावा केल्या. दीप्ति शर्माने 54, पूनत राउत 39, कर्णधार मितालीने 4 कौर 8, पूजा 12 तर शिखा पांडेनं 18 धावा केल्या.