IND vs ENG: सरफराज-जुरेलला मिळणार BCCI चा सेंट्रल क्रॉन्ट्रॅक्ट? पाहा नियम काय सांगतो

भारतविररूद्ध इंग्लंड यांच्यात सध्या पाच टेस्ट सामन्यांची कसोटी सुरू आहे. या कसोटीमध्ये टीम इंडियाचे दोन धाकड फलंदाज ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी धमाकेदार अंदाजात पदार्पण करून आपली छाप सोडलीय, तरी बीसीसीआयने नवा अॅनुअल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केलेली आहे. पण दुर्देवाने या कॉन्ट्रॅक्टमधून जुरेल आणि सरफराज या दोघांना वगळण्यात आलं आहे.  

Updated: Feb 29, 2024, 01:50 PM IST
IND vs ENG: सरफराज-जुरेलला मिळणार BCCI चा सेंट्रल क्रॉन्ट्रॅक्ट? पाहा नियम काय सांगतो title=

BCCI Annual Contracts : भारत आणि इंग्लंड पाच टेस्ट मॅचेसची सिरीज चालू असतानाच  भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) बुधवारी आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली. इंग्लंडविरूद्ध राजकोट टेस्ट मॅचमध्ये भारताच्या ध्रुव जुरेल (Dhruv jurel) आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) या दोघांनी दमदार पदार्पण केले होते. सरफराजने राजकोट टेस्टमध्ये दोन अर्धशतक झळकवून आणि जुरेलने रांची टेस्टमध्ये 90 रन्सची महत्वाची खेळी खेळून जगाला आपल्या शैलीची ओळख दाखवली होती. तरी बीसीसीआयने दोघं तरूण प्रतिभावान खेळाडूंना त्यांच्या अॅनुअल कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील केलेलं नाही. पण या दोघं खेळाडूंसाठी धर्मशाला टेस्ट ही आशेचा किरण आहे, कारण या टेस्टनंतर जुरेल आणि सरफराज या दोघांनाही C ग्रेड कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो.

जुरेल-सरफराज यांना मिळणार C ग्रेड कॉन्ट्रॅक्ट?

बीसीसीआयच्या नियमानुसार, 1 ऑक्टोबर 2023 पासून 30 सप्टेंबर 2024 च्या कालावधीत कोणताही क्रिकेटर जो 8 वनडे किंवा 3 टेस्ट किंवा 10 टी-20 इंटरनॅशनल मॅचेस खेळणार, तर तो खेळाडू बीसीसीआयच्या C ग्रेड कॉन्ट्रॅक्टमध्ये शामिल होणार आहे. यामुळे सरफराज आणि जुरेल यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे.

हे दोन्ही प्लेयर्स आधीच प्रत्येकी 2-2 टेस्ट मॅचेस खेळले आहेत. जर धर्मशाळेमध्ये होणारी टेस्टमध्ये जुरेल आणि सरफराज खेळले तर त्यांना C ग्रेड  कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो. बीसीसीआयने यासोबत असंही सांगितले आहे की, जे खेळाडू इंटरनॅशनल टीममध्ये सामील नसतील त्यांना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे गरजेचे आहे.

रोहित आणि कोहली A+ ग्रेडमध्ये

रोहित आणि कोहली यांना A+ ग्रेडमध्ये ठेवण्यात आले आहे. याच ग्रेडमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचाही समावेश आहे. रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांना A ग्रेड देण्यात आला आहे. अक्षर पटेलला A ग्रेडमधून B ग्रेडमध्ये ढकलण्यात आले आहे. अक्षरसोबतच सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव आणि यशस्वी जायसवाल यांनाही B ग्रेड देण्यात आला आहे.

नवे भारतीय चेहरे C ग्रेडमध्ये

रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांना C ग्रेडमध्ये ठेवले आहे. साधारण A+ ग्रेडमध्ये सामील खेळाडूंना दर वर्षाला 7 कोटी, A ग्रेडच्या खेळाडूंना 5 कोटी, B ग्रेडच्या खेळाडूंना तीन कोटी आणि C ग्रेडच्या खेळाडूंना एक कोटी रुपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम त्यांच्या सामन्यांच्या फी व्यतिरिक्त असते.