मुंबई : इंग्लंडने टीम इंडियावर (Ind vs Eng) सेमी फायनलमध्ये (Semi Final) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2022) पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pak Vs Eng) असा सामना रंगणार आहे. तर सेमी फायनलमधील पराभवामुळे टीम इंडियाचं (Indian Cricket Team) वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे. (ind vs eng semi final t 20 world cup rohit sharma may step down of captaincy afer lost against england)
रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली. मात्र सेमी फायनलपर्यंतची जोरदार कामगिरी टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये दाखवता आली नाही. या पराभवानंतर रोहित कॅप्टन्सी सोडणार असल्याचं म्हटलं जातंय.
रोहितने वर्षभरात आतापर्यंत 2 कसोटी, 16 वनडे आणि 50 टी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. यापैकी 2, 13 आणि 39 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. रोहितचं नेतृत्व आतापर्यंत दमदार राहिलंय. मात्र वर्ल्ड कप विजयाची प्रतिक्षा रोहितच्या नेतृत्वात संपेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र आव्हान संपुष्टात आल्याने रोहित नेतृत्व सोडणार असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान आता वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याचं आयोजन रविवारी 13 नोव्हेंबरला करण्यात आलंय. त्यामुळे या दोघांपैकी कोणता संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टी चॅम्पियन होणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.