टीम इंडियावर कोरोनाचं सावट, ऋषभ पंतनंतर या लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. 

Updated: Jul 15, 2021, 07:06 PM IST
टीम इंडियावर कोरोनाचं सावट, ऋषभ पंतनंतर या लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह title=

मुंबई: टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. या सीरिजआधी धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली. टीम इंडियामध्ये कोरोना घुसला. 

पंतनंतर आता आणखी एक सदस्य कोरोना विषाणूच्या चाचणीत सकारात्मक आला आहे. टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसह स्टाफ मेंबर्सचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी एका सपोर्ट स्टाफचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

कोरोना विषाणू चाचणीत सकारात्मक आढळल्यानंतर आता इंग्लंडमधील कोरोना टेस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा थ्रोडाउन विशेषज्ञ दयानंद जारानी सकारात्मक पॉझिटिव्ह आला आहे. भारतीय संघातील सपोर्ट 2 सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ही खूप वाईट आणि धक्कादायक बातमी आहे.

यापूर्वी टीम इंडियाचे 2 क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तर आता टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत पॉझिटिव्ह आला आहे. ऋषभ पंत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 

इंडियन क्रिकेट टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत असताना त्याचा फटका आता टीम इंडियालाही बसला आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या ऋषभ पंत इंग्लंडमध्ये त्याच्या नातेवाईकांकडे क्वारंटाईन झाला आहे. 

काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत युरो कपची मॅच पाहण्यासाठी गेला होता. इंग्लंड विरूद्ध जर्मनीची मॅच पाहण्यासाठी पंत लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये गेला होता. यावेळी त्याने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते. विनामास्क फोटो काढल्यामुळे पंतला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.