IND vs ENG : पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी इंडिया-इंग्लंड सज्ज, फायनलमध्ये कोण धडकणार?

T20 World Cup 2022: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यात सेमी फायनलचा दुसरा सामना होणार आहे. 

Updated: Nov 10, 2022, 11:30 AM IST
IND vs ENG : पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी इंडिया-इंग्लंड सज्ज, फायनलमध्ये कोण धडकणार? title=

IND vs ENG T20 World Cup Semi-Final Updates : पाकिस्तानने न्यूझीलंडवर (PAK Vs NZ) टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या पहिल्या सेमी फायनल (Semi Final 1)  सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 153 धावांचे आव्हान पाकिस्तानने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. कॅप्टन बाबर आझमने (Babar Azam) 53 रन्सची अर्धशतक खेळी केली. तर  मोहम्मद हरीसने (Mohammad Haris) 30 रन्सचं योगदान दिलं. पाकिस्तानची ही एकूण फायनलमध्ये पोहचण्याची तिसरी तर 2009 नंतर पहिलीच वेळ ठरलीय. दरम्यान आता फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध कुणाचा सामना होणार हे गुरुवारी 10 नोव्हेंबरला ठरणार आहे.  (ind vs eng t20 india vs england semi final match decides 2nd qualifier of t20 world cup final against pakistan latest cricket news)

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यात सेमी फायनलचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ हा वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी पाकिस्तान विरुद्ध दोन हात करणार आहे. सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्याला  दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी एडलेडला सुरुवात होणार आहे.

भारत-पाक पुन्हा फायनलमध्ये?

टीम इंडियाचे सर्वच खेळाडू वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यांपासून धमाकेदार कामगिरी करतायेत. प्रत्येक खेळाडूने भारताच्या विजयात आपलं योगदान दिलंय. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडही सज्ज आहे. यामुळे जर भारताचा पराभव झाला, तर क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होईल. मात्र भारताने इंग्लंडला पराभूत केलं तर पाकिस्तान विरुद्ध रविवारी हायव्होल्टेज सामना रंगेल. त्यामुळे आता दुसरी सेमीफायनल कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.