मुंबई: तिसऱ्या वन डे सामन्यात 7 धावांनी भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवण्यात टीम इंडियाला यश आलं. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिजवरून मात्र वाद झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्हीच्या निर्णयावरून विराट कोहली चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
अटीतटीच्या या लढीतीत टीम इंडियाला मॅन ऑफ द मॅच आणि सीरिजचं श्रेय न मिळाल्यानं विराट कोहली चांगलाच संतापला. गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारचं श्रेय इंग्लंडच्या गोलंदाजांना देण्यात आलं.
भारतीय खेळाडूंना न मिळाल्याबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिलगिरी व्यक्त केली. इंग्लंडविरुद्ध कोहलीच्या थरारक विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना शार्दुल ठाकूरने सामनावीर आणि भुवनेश्वर कुमारला सामनावीर म्हणून न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
शार्दुल ठाकूरने 30 धावा करण्या व्यतिरिक्त 4 विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमारने संपूर्ण मालिकेत चांगली गोलंदाजी केली. तिसर्या वनडे सामन्यात इंग्लंडकडून नाबाद 95 धावा करणारा सॅम कुरन याला सामनावीर आणि जॉनी बेअरस्टो (मॅनी ऑफ द सीरिज) घोषित करण्यात आलं. त्यामुळे कोहलीनं नाराजी व्यक्त केली.
'मला आश्चर्य वाटते की शार्दुल ठाकूर मॅन ऑफ द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरिज दिलं नाही. हे दोघंही खूप कठीण परिस्थिती असतानाही जबरदस्त खेळले. तिसऱ्या वन डेमध्ये शार्दुल ठाकूरने 4 गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमारने 10 षटकांत केवळ 42 धावा देऊन 3 बळी घेतले. 'एकूणच दिलेल्या निर्णयाबाबत विराट कोहलीनं संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.