IND vs NZ मध्ये दुसरा टी20 सामना, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग XI

IND vs NZ 2nd ODI: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, अशी असेल प्लेइंग XI 

Updated: Nov 26, 2022, 08:12 PM IST
 IND vs NZ मध्ये दुसरा टी20 सामना, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग XI  title=

IND vs NZ 2nd ODI : तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना न्युझीलंडने (New Zealand) 7 विकेटसने जिंकला आहे. तर दुसरा टी20 सामना उद्या 27 नोव्हेंबर 2022 रोजी हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon park) येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान या सामन्याचे पिच रिपोर्ट आणि प्लेइंग XI जाणून घेऊयात. 

 हे ही वाचा : टीम इंडिया की न्युझीलंड? हॅमिल्टनमध्ये कोणता संघ कोणावर भारी? जाणून घ्या

न्युझीलंडने (India vs New Zealand) टीम इंडिया विरूद्ध पहिला सामना 7 विकेटसने जिंकला होता. या विजयानंतर न्युझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon park)  येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोचा असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर न्युझीलंड मालिका खिशात घालेल आणि जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर मालिकेत 1-1 ने बरोबरीत येतील.  

पिच रिपोर्ट

या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 363 धावा ठोकल्या आहेत आणि 92 धावांत संपुर्ण टीम देखील ऑलआऊट झाली आहे. तसेच येथे गेल्या तीन सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 300+ धावा केल्या आहेत.येथे 300+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणेही अवघड नाही. फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलंडने (New Zealand) येथे 348 धावांचे सहज पाठलाग केला होता.  

हवामानाचा अंदाज काय? 

रविवारी होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजेच पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

दरम्यान या मालिकेत न्युझीलंड (New Zealand) 1-0 ने आघाडीवर आहे.आता दुसरा सामना कोण जिंकते हे पाहावे लागणार आहे.  

टीम इंडिया प्लेइंग XI : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडची प्लेइंग XI: फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.