IND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर

IND vs NZ 2nd ODI: क्रिकेट सामन्यात विराट कशी करतो इतकी तुफानी फटकेबाजी? एका व्हिडीओमुळं झाली पोलखोल. व्यवस्थित पाहून घ्या हे पदार्थ, ज्यातून मिळतं पोषण आणि भागवले जातात जीभेचे चोचले. 

Updated: Jan 21, 2023, 09:26 AM IST
IND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर  title=
IND vs NZ 2nd ODI what do team india eat before cricket match

Raipur ODI Live: (Team India) भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही काळापासून चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी पाहता त्यांचं योगदानही वाखाणण्याजोगं आहे असंतच म्हणावं लागेल. आता अनेकांनाच प्रश्न पडलाय, की टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) वेळी गटांगळ्या खाणारा भारतीय संघ एकाएकी क्षणात इतक्या आवेगानं कसा खेळू लागला? यामागचं नेमकं गुपित काय? कुणी यांची कानउघडणी केली की कुणी जरा जास्तच कठोर नियम लागू केले? 

क्रिकेटप्रेमींना हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण, मुद्दा थोडा वेगळाच आहे. कारण, सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक (Viral Video) व्हिडीओ पाहता टीम इंडियाचे खेळाडू नेमके इतकी तुफानी कामगिरी कसे करत आहेत यामागचं गुपित समोर आलं आहे. हे गुपित म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचं खाणं. 

युझवेंद्र चहलच्या Chahal TV मुळं समोर आलं सत्य... 

रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पहिल्यांदाच कोणतातरी आंतरराष्ट्रीय सामना पार पडत आहे. त्यातही भारतीय संघच या सामन्यात खेळणार असल्यामुळं सध्या तिथं उत्साहाचं वातावरण आहे. याच स्टेडियमच्या ड्रेसिंग रुमचा (Team india dressing room) एक व्हिडीओ युझवेंद्र चहलनं (yuzvendra chahal) शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो संपूर्ण ड्रेसिंग रूम दाखवल्यानंतर थेट खेळाडूंच्या खाण्यामध्ये नेमकं काय असतं तेसुद्धा दाखवत आहे. 

हेसुद्धा वाचा : Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

 

आता तुम्ही म्हणाल हे खेळाडू म्हटलं तर त्यांच्या जेवणात (Boiled vegetables) उकडलेल्या भाज्या, (Grilled Meat) मांस, (Fruits) फळं असं काहीतरी असेल. हा तुमचा गैरसमज असू शकतो असं म्हणायला हरकत नाही. कारण, इथं खेळाडूंसाठी जी मेजवानी तयार केली आहे त्यात असणारे पदार्थ पूर्णपणे वेगळे आहेत. 

रायपूरमध्ये (Raipur ODI Live) भारतीय संघातील खेळाडूंच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नान, स्टीम राईस, जीरा राईस, दाल टमाटर, आलू जीरा, पनीर टमाटर, ग्रील्ड वेजिटेबल, पास्ता इन मिक्स सॉस, वेज हाक्का नूडल्स, चायनिज, फ्राईड राईस या अशा पदार्थांची रांग लागलेली आहे. या सगळ्यातून युझीनं  वेज पास्ताला पसंतीही दिली आहे. त्यामुळं खेळाडूंच्या खाण्याच्या आवडीनिवडी नेमक्या कशा आहेत याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.