IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून शनिवारी पुण्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. न्यूझीलंडने 113 धावांनी सामना जिंकला असून यासह सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. तब्बल 12 वर्षांनी टीम इंडियाने भारतात टेस्ट सीरिज गमावली. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फार नाराज झाला. तर विराट कोहली (Virat Kohli) देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही. आता तिसऱ्या टेस्टपूर्वी हे दोन्ही अनुभवी फलंदाज ब्रेकवर गेले आहेत.
रिपोर्टनुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे तिघे आपल्या कुटुंबासोबत शनिवारी सामना संपल्यावर मुंबईला रवाना झाले. तर टीम इंडियाचे उर्वरित खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफ रविवारी मुंबईला परततील. 1 नोव्हेंबर पासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना खेळवला जाणार असून तिसऱ्या टेस्टच्यापूर्वी दोन दिवस खेळाडूंना ब्रेक दिला जाणार आहे.
हेही वाचा : एकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक
तिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी दोन दिवसांच्या ब्रेकनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू 30 आणि 31ऑक्टोबरला होणाऱ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभाग होतील. हे प्रॅक्टिस सेशन अटेंड करणं टीम इंडियाचा सर्व खेळाडूंसाठी अनिवार्य असणार असून यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही. सहसा असे दिसून येते की वरिष्ठ खेळाडू आणि वेगवान गोलंदाज दुखापती टाळण्याबरोबरच वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन सरावात जास्त भाग घेत नाहीत किंवा हलके व्यायाम करत नाहीत. मात्र हे प्रॅक्टिस सेशन सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे. सलग 18 टेस्ट सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला न्यूझीलंडकडून सलग दोनदा पराभव स्वीकारावा लागला. अशावेळी आता टीमला शेवटचा सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.