IND vs NZ : 'टेलएंडर्स'चं भूत पुन्हा टीम इंडियाच्या मानगुटीवर

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम संकटात सापडली आहे.

Updated: Mar 1, 2020, 05:46 PM IST
IND vs NZ : 'टेलएंडर्स'चं भूत पुन्हा टीम इंडियाच्या मानगुटीवर title=

क्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम संकटात सापडली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ८९/६ एवढा आहे. न्यूझीलंडचा २३५ रनवर ऑलआऊट केल्यामुळे भारताला ७ रनची आघाडी मिळाली आहे. ही आघाडी आणखी झाली असती, पण पुन्हा एकदा टेलएंडर्सचं भूत भारताच्या मानगुटीवर बसलं.

पहिल्या दिवशी भारतीय टीम २४२ रनवर ऑलआऊट झाल्यानंतर न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता ६३ रन केले होते. दुसऱ्या दिवसाच्या लंचनंतर न्यूझीलंडचा स्कोअर १५३/७ एवढा झाला होता. तरीही भारतीय बॉलरना न्यूझीलंडला २०० रनच्या आत ऑलआऊट करता आलं नाही.

न्यूझीलंडच्या शेवटच्या ३ विकेटनी ८२ रन केले. काईल जेमिसनने पुन्हा एकदा शानदार ४९ रनची खेळी केली. जेमिसनने नील वॅगनरसोबत नवव्या विकेटसाठी ५१ रनची पार्टनरशीप केली.

मागच्या २ वर्षात भारतीय टीमला खालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या बॅट्समनना आऊट करण्यात नाकी नऊ आले आहेत. २०१८ सालचा इंग्लंड दौरा यातलं सर्वोत्तम उदाहरण आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या काही टेस्ट मॅच भारताला तळाच्या विकेट घेता न आल्यामुळे गमवाव्या लागल्या होत्या. 

इंग्लंड दौऱ्यातही टेलएंडर्सचा त्रास