IND vs NZ : तिसऱ्या T20 मध्ये या खेळाडूचा पत्ता कापणार, या 2 नव्या खेळाडू्ंना मिळणार संधी

मालिकेतील तिसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा तरुणांना आजमावू शकतो.

Updated: Nov 21, 2021, 01:00 AM IST
IND vs NZ : तिसऱ्या T20 मध्ये या खेळाडूचा पत्ता कापणार, या 2 नव्या खेळाडू्ंना मिळणार संधी title=

मुंबई : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. यासह भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा तरुणांना आजमावू शकतो, जेणेकरून भविष्यातील संघ तयार करता येईल. त्याचबरोबर एक खेळाडू असा आहे की ज्याची कामगिरी विशेष झाली नाही. त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. (India vs New zealand)

हा खेळाडू पदार्पण करू शकतो

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या आवेश खानने (Avesh Khan) आयपीएल 2021 मध्ये मान उंचावली. त्याच्या गोलंदाजीने तर कहरच निर्माण केला होता. आवेश खानने आयपीएल 2021 मध्ये 16 सामन्यात 24 विकेट घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. टीम इंडियासाठी नेट बॉलर म्हणूनही त्याचा सहभाग होता. त्याचे स्विंग चेंडू खेळणे फलंदाजांसाठी अजिबात सोपे नाही. तो दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचा प्रमुख भाग होता. देशांतर्गत स्पर्धेतही आवेश खानची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. 

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक होणार आहे, त्यासाठी रोहित आतापासूनच खेळाडूंची फौज तयार करू इच्छितो. या सामन्यात आवेश खान टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो.
 
या खेळाडूला संधी मिळू शकते!

IPL 2021 मध्ये ऋतुराज गायकवाडने CSK साठी धमाका दाखवला. ऋतुराजने (Ruturaj gaikwad) आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. आयपीएल 2021 मध्ये, त्याने 16 सामन्यांमध्ये 45.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राइक रेटने 635 धावा केल्या आणि तो ऑरेंज कॅपलाही पात्र होता. यादरम्यान त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले आयपीएल शतकही झळकावले. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने CSK ला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या T20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी रोहित शर्मा त्याला संधी देऊ शकतो.

भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची गेल्या काही दिवसांतील कामगिरी अत्यंत मध्यम स्वरूपाची आहे. कुमारला खूप चांगली कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमारने चार ओव्हरमध्ये 39 धावा देऊन केवळ 1 बळी घेतला, तो खूप महागडा गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले. कुमारच्या चेंडूंमध्ये ती जादू दिसत नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. त्याचे चेंडू स्विंग होत नाहीत. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने त्याच्या चेंडूंवर जोरदार फटकेबाजी केली. भुवनेश्वर कुमारची T20 विश्वचषक 2021 मधील कामगिरी चांगली नव्हती.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत 2022 च्या T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी भारताकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका आधीच जिंकली आहे. नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा काही नवीन खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. जेणेकरून भविष्यातील संघ तयार करता येईल. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान अजूनही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसण्याची प्रतीक्षा करत आहेत.