मुंबई : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी (IND vs NZ Test Series) टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलला (K L Rahul) दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. ही दुखापत मुंबईकर खेळाडूच्या पथ्यावर पडली आहे. या खेळाडूला लॉटरी लागली आहे. केएलच्या जागी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे. (ind vs nz test series 2021 bcci added suryakumar yadav in team india squad against new zealand test series due to k l rahul injurey)
बीसीसीआयने 12 नोव्हेंबरला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. मात्र त्यावेळेस सूर्याला संधी मिळाली नव्हती. मात्र केएलला दुखापत झाल्याने सूर्याचं नशिब फळफळलं आहे. या संधी निमित्ताने सूर्याला टी 20, वनडेनंतर कसोटी पदार्पण होणार आहे.
केएलच्या डाव्या मांडीच्या स्नायूचा त्रास अजूनही कायम आहे. या दुखापतीमुळे केएल न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यातही खेळला नव्हता. हा त्रास अजूनही होता. त्यामुळे अखेर केएलने कसोटी मालिकेतून स्वत:चं नाव मागे घेतलं.
रोहित केएलच्या अनुपस्थितीत सलामीला कोण?
या मालिकेत रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. तसेच आता केएलही उपलब्ध नाही. त्यामुळे सलामीला कोण खेळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशा परिस्थितीत शुबमन गिल आणि मयंक अगरवाल ओपनिंग करु शकतात. तसेच पहिल्या कसोटीत सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर या दोघांपैकी एकाला पदार्पणाची संधी मिळू शकते. जो खेळाडू पदार्पण करेल तो मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतो.
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव , मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (रिझर्व्ह विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्द कृष्णा.
टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेवेन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रविंद्र, टीम साउदी, कायले जेमीन्सन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, ऐजाज पटेल, विल समरविल आणि ग्लेन फिलिप्स.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.
दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई.