राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Updated: Dec 6, 2021, 05:14 PM IST
राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं  title=

मुंबई : टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 1-0 अशा फरकाने मालिका जिंकली. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने ही मालिका जिंकली. राहुल द्रविडची हेड कोच म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका होती. (ind vs nz test series 2021 team India surpassed to new zealand and reach to top position  in test ranking under to rahul dravid coaching)

या पहिल्याच कसोटी मालिकेत कोच राहुल द्रविडने कारनामा केला आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेल्या विजयासह टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहचली आहे. 

आयसीसीने टीम इंडियाच्या विजयानंतर ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयाचा फायदा टीम इंडियाला झाला. 

या विजयामुळे टीम इंडियाच्या खात्यात 12 पॉइंट्सची भर पडली. ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाचे एकूण रेटिंग्स पॉइंट्स हे 124 इतके आहेत. 
 
टेस्ट रँकिंगमध्ये कोण कुठे? 

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. यानंतर टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंड 121 पॉइंट्ससह  दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. 

मायदेशात सलग 14 वाा मालिका विजय

टीम इंडियाचा मायदेशातील हा सलग 14 वा मालिका विजय ठरला. या मालिकेत अनुभवी फिरकीपटू आर आश्विन चमकला. 

अश्विनने दोन्ही सामन्यात सर्वाधिक 14 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने घोषित करण्यात आलं. अश्विनने पहिल्या सामन्यात 6 तर दुसऱ्या टेस्टमध्ये 8 विकेट्स पटकावल्या.   

टीम इंडियाचा आफ्रिका दौरा 

दरम्यान न्यूझीलंडला चितपट केल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

टीम इंडियाने आतापर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे कर्णधार विराट आणि कोच द्रविडसमोर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचे आव्हान असणार आहे.