पार्ल | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SA 2nd Odi) विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 287 धावा केल्या. टीम इंडियाकडून विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंत (Rishabh Pant) आणि केएल राहुल (K L Rahul) या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) महत्त्वाची नाबाद खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून तरबेझ शम्शीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (ind vs sa 2nd odi team india set 288 runs target for winning south africa at boland park paarl)
कॅप्टन केएल आणि रिषभ पंत या दोघांनी केलेल्या केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला 287 धावांपर्यंत मजल मारता आली. रिषभ पंतने 71 चेंडूत 10 फोर आणि 2 सिक्ससह 85 धावांची खेळी केली. तर केएलने 55 रन्स केल्या. तसेच शार्दुल ठाकूरने शेवटच्या काही ओव्हरमध्ये नाबाद 40 धावांची निर्णायक खेळी केली. तर रवीचंद्रन अश्विनने नाबाद 25 धावा करत शार्दुलला चांगली साथ दिली.
साऊथ आफ्रिका | क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जनेमन मालन, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लुंगी एनगिडी, सिसांडा मगला आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.