IND vs SA 3rd Test | विषय गंभीर पण भाऊ खंबीर, विराट-पंतची कडवी झुंज

 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA 3rd Test) यांच्यात केपटाऊनमध्ये (Capetown) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.  

Updated: Jan 13, 2022, 05:00 PM IST
IND vs SA 3rd Test | विषय गंभीर पण भाऊ खंबीर, विराट-पंतची कडवी झुंज title=

केपटाऊन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA 3rd Test) यांच्यात केपटाऊनमध्ये (Capetown) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishbh Pant)  या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजीला जशास तसं उत्तर दिलं आहे. टीम इंडियाने झटपट विकेट्स गमावल्यानंतर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. लंचपर्यंत टीम इंडियाने 43 ओव्हरमध्ये 4 बाद 130 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे टीम इंडियाकडे आता 143 धावांची आघाडी आहे. (ind vs sa 3rd test day 3 team india give 143 runs lead till lunch break virat kohli and rishbh pant make 72 runs not out partnership for 5th wicket at newlands cape town)  

आफ्रिकेला दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात टीम इंडियाने 210 धावांवर ऑल आऊट केलं. त्याआधी टीम इंडियाने फस्ट इनिंगमध्ये 223 धावा केल्या. यामुळे विराटसेनेला 13 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. 

या आघाडीसह टीम इंडियाने दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाने 2 बाद 57 धावा केल्या. विराट आणि पुजारा नॉट आऊट परतले. 

मात्र तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने सलग 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावले. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे ही जोडी पुन्हा अपयशी ठरली. पुजाराने 9 तर रहाणे 1 धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडियाची 19 ओव्हरमध्ये  4 बाद 58 अशी बिकट स्थिती झाली.

विराट-पंतची जोडी जमली

मात्र यानंतर विराट-पंतने कडवी झुंज दिली. या दोघांनी लंचपर्यंत 72 धावांची नाबाद भागीदारी केली. टीम इंडियाकडे आता 143 धावांची आघाडी आहे. विराट 28 तर पंत 51 धावांवर नाबाद खेळत आहे. या दोघांकडून टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. 

दक्षिण आफ्रिका | डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एनगिडी. 

टीम इंडिया : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.