IND VS SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयची हैराण करणारी डील

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दाखल झाला आहे. कोरोनाचा रुग्ण वाढत असताना देखील भारतीय संघाचा हा दौरा सुरु होणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Updated: Dec 22, 2021, 08:00 PM IST
IND VS SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयची हैराण करणारी डील title=

मुंबई : टीम इंडिया आता काही दिवसांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे ही मालिका खेळाडूंसाठी धोक्याची मानली जात आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी यजमान मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. (iNDIA VS SOUTH AFRICA SERIES)

दक्षिण आफ्रिका बोर्डाचा मोठा निर्णय

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) चे वैद्यकीय अधिकारी सुहैब मांजरा यांनी सांगितले की, BCCI (क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया) आणि CSA यांनी परस्पर सहमती दर्शवली आहे की, खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह केस समोर आले तरी दोन्ही संघ या भविष्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिका सुरूच राहतील आणि जवळच्या संपर्कांना क्वारंटाईनमध्ये राहण्यास भाग पाडले जाणार नाही. भारतीय संघ 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करेल, त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये 3 ते 7 जानेवारी दरम्यान दुसरी कसोटी आणि 11 ते 15 जानेवारी दरम्यान केपटाऊनमध्ये तिसरी कसोटी खेळली जाईल. कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल, ज्यांचे सामने 19, 21 आणि 23 जानेवारी रोजी होतील.

कोरोना खूप वेगाने पसरतोय

दक्षिण आफ्रिकेत जिथे नवीन कोविड व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळला आहे तिथे परिस्थिती बिघडली तरच बीसीसीआय दौऱ्यातून माघार घेऊ शकते यावर एक विशिष्ट एकमत बनवलं गेलं आहे. सीएसएने पीटीआयला मांजरा यांची प्रतिक्रिया दिली, "आम्ही भारताशी चर्चा केली आणि प्रोटोकॉलवर सहमती दर्शवली. 'बायो-बबल'च्या आत प्रत्येकाला लसीकरण करण्यात आले असते, हे लक्षात घेऊन, जर एखादा पॉझिटिव्ह केस समोर आला आणि त्याची प्रकृती स्थिर असेल तर त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाईल. खेळाडूंची दररोज चाचणी केली जाईल.'

मालिका रद्द होणार नाही

खेळाडूंची दररोज कोरोना चाचणी केली जाईल आणि दोन्ही संघ सकारात्मक प्रकरणांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीसाठी तयार आहेत. पण जोपर्यंत योग्य ती खबरदारी घेतली जाईल, तोपर्यंत ही मालिका सुरूच राहणार आहे. 'सीएसएने भारतीय संघाला दिलेल्या बायो-बबलबद्दल बीसीसीआय खूप समाधानी आहे. होय, आम्ही निश्चितपणे आमच्या खेळाडूंच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हिताचा निर्णय घेऊ.' बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली. 'सध्या प्रत्येकजण जैविकदृष्ट्या सुरक्षित वातावरणात आहे आणि नियमित चाचण्या केल्या जात आहेत.'

'एखादा खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ पॉझिटिव्ह असू आला तर संपर्कात आलेल्यांची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आले तरी त्यांना स्वतःला क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागले होते. पण जेव्हा असे होते तेव्हा सामना सुरू ठेवणे कठीण होते.'