IND vs SA ODI : संजू सॅमसनला संधी मिळणार की नाही? कॅप्टन KL Rahul स्पष्टच म्हणाला, 'मी विकेटकिपर असल्याने...'

KL Rahul Press conference : आगामी साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या  (India vs South Africa) वनडे सिरीजआधी टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 16, 2023, 06:29 PM IST
IND vs SA ODI : संजू सॅमसनला संधी मिळणार की नाही? कॅप्टन KL Rahul स्पष्टच म्हणाला, 'मी विकेटकिपर असल्याने...' title=
IND vs SA ODI, KL Rahul, Press conference

KL Rahul On Sanju Samson : टीम इंडिया वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच वनडे मालिका खेळण्यासाठी (India vs South Africa) साऊथ अफ्रिकेच्या दौऱ्यावर पोहोचली आहे. युवा चेहऱ्यांना संधी दिल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग अशा तगड्या खेळाडूंना संधी देण्यात आल्याने आता प्लेईंग इलेव्हनमध्ये नेमकी कोणाला संधी मिळणार? यावर प्रश्नचिन्ह लागला आहे. अशातच आता सिरीजपूर्वी कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) याने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळणार की नाही? यावर त्याने उत्तर दिलंय.

काय म्हणाला KL Rahul ?

जेव्हा तुम्ही टीम इंडियामध्ये खेळता, तेव्हा तुम्ही देशाचं नेतृत्व करता. त्यामुळे मला वाटत नाही की कोणाला आत्मविश्वसााची गरज आहे. माझा सध्या फोकस फक्त वनडे सिरीजवर आहे. मी विकेटकिपिंगसाठी आणि मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासाठी तयार आहे, असं केएल राहुल याने सांगितलं आहे. माझ्यावर जी जबाबदारी आहे, त्याला मी पूर्णत्वास नेईल. तुम्हाला संघात जागा पाहिजे असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. आमच्यासाठी कोणतीही गोष्ट नवीन नाही. संघात ज्यांना सामील केलंय, त्यांच्यावर माझा विश्वास आहे. आम्ही सीरिज जिंकण्यासाठी उत्सुक आहोत.

रिंकू सिंहची जागा पक्की!

आम्ही वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे खेळलो, त्याच कोणताही बदल करण्याची गरज नाही. मात्र, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. रिंकूने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलंय. आम्ही सर्वजण त्याच्या खेळीने प्रभावित झालोय. त्यामुळे त्याला नक्की संधी मिळेल, असं केएल राहुलने सांगितलं आहे. 

संजूला संधी मिळणार की नाही?

संजू सॅमसन मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळला आहे. त्यामुळे त्याला संधी दिली जाईल. या सिरीजमध्ये मी विकेटकिपर असणार आहे. मात्र, फलंदाज म्हणून त्याला 5 किंवा 6 नंबरवर खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं केएल राहुलने सांगितलं आहे.

टीम इंडिया - ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल. , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका- एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डसेन, काइल वेरिने, लिझार्ड विल्यम्स.