विराट आणि रोहित नंतर टीम इंडियाचा 'हा' कर्णधार इतक्या कोटींचा मालक

भारत - दक्षिण आफ्रिकेत सध्या टी-20 मालिका सुरु आहे. 

Updated: Jun 12, 2022, 02:47 PM IST
विराट आणि रोहित नंतर टीम इंडियाचा 'हा' कर्णधार इतक्या कोटींचा मालक title=

मुंबई : भारत - दक्षिण आफ्रिकेत सध्या टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करतोय.पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याचं सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर आज या मालिकेचा दुसरा सामना आहे. दरम्यान अवघ्या २४ व्या वर्षी टीम इंडियाचे नेतृत्व करणारा ऋषभ पंत नेमका किती कोटीच्या संपत्तीचा मालक आहे, जाणून घेऊयात...

आलिशान घर
यष्टिरक्षक ऋषभ पंतचे आलिशान घर असून यात मोठ मोठ्या खोल्या आहेत. तसेच या घरात खुप चांगले फर्निचर आहेत. तसेच या घरात चांगले पेंटीग्स लावण्यात आले आहे.   

घरात उभारलंय जीम 
ऋषभ पंत हा त्याच्या फिटनेसवर खुप लक्ष देतो. यासाठी त्याने आपल्या घरात एक छोटी जिमही बनवली आहे. घरी असल्यावर तो नेहमी या जीमचा वापर करतो.  

महागड्या गाड्या
डावखुरा फलंदाज ऋषभ पंतला कारची खूप आवड आहे. कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज, ऑडी 8 आणि फोर्ड कारचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे.

गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
ऋषभ पंतही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खुप चर्चेत असतो. पंत गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगीला डेट करत आहे. ईशा नेगी मूळची उत्तराखंडची असून ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. आयपीएल 2022 मध्येही ईशा नेगी पंतला चिअर करताना दिसली होती.

ईशा नेगी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. ईशा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा स्टायलिश फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये ती पारंपारिक ते वेस्टर्न स्टाइलच्या पोशाखात दिसते.

किती आहे संपत्ती? 
अवघ्या २४ व्या वर्षी पंतने करोडो रुपयांची संपत्ती जमा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतने 2020 मध्ये 29.19 कोटी रुपये कमावले आहेत. त्याचवेळी, 2021 मध्ये पंतची एकूण संपत्ती 5 दशलक्ष डॉलर्स होती. सध्या ऋषभ पंतची एकूण संपत्ती 8.5 दशलक्ष डॉलर (66.42 कोटी रुपये) आहे.

दरम्यान ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका सध्या टी-20 मालिका खेळतेय. या मालिकेत आज दुसरा टी-20 खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विजय मिळवते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.