मुंबई : आयपीएल 2021 नंतर अनेक खेळाडूंनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. आता टीम इंडियातील एका खेळाडू देखील संन्यास घेण्याच्या विचारात आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
केपटाऊनमध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 कसोटी सामन्यांच्या सीरिजमधील शेवटचा सामना सुरू आहे. सध्या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियामध्ये अनेक मॅच विनर खेळाडूंचा समावेश आहे. एकाही खेळाडूला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळालेली नाही.
प्रशिक्षक आणि कर्णधार ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना सातत्याने संधी देत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीनही कसोटी सामन्यांमध्ये टॅलेंट असूनही एका खेळाडूला बाहेर बसण्याची वेळ आली. अशा परिस्थितीतलवकरच निवृत्तीबाबत घोषणा केली जाऊ शकते.
हा क्रिकेटपटू घेऊ शकतो संन्यास
स्टार विकेटकीपर आणि बॅट्समन ऋद्धिमान साहा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर रिषभ पंत खराब फॉर्ममध्ये खेळत असून सातत्याने त्याला संधी दिली जात आहे. साहासारख्या स्फोटक फलंदाजाला प्रशिक्षक आणि कर्णधार संधी देत नसल्याचं दिसत आहे.
साहा 36 वर्षांचे आहेत. जोपर्यंत पंत संघात आहे तोपर्यंत साहाला संधी मिळणं कठीण असल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत साहा दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवृत्ती घेऊ शकतो.
ऋद्धिमान साहा कारकीर्द
ऋद्धिमान साहा हा खूप चांगला विकेटकीपर आणि त्यासोबत फलंदाज आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. साहाचे यष्टिरक्षण कौशल्य ऋषभ पंतपेक्षा खूप चांगले आहे. साहाने न्यूझीलंडविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. निवड समिती आणि कर्णधाराने या खेळाडूकडे दुर्लक्ष केले आहे.
साहाने 2010 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने भारतासाठी 38 कसोटी सामन्यांमध्ये 1251 धावा केल्या आहेत. रेड बॉल क्रिकेटमध्ये, अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) नंतर साहा पहिल्या क्रमांकाचा विकेटकीपर फलंदाज होता.