मुंबई: जगभरात कोरोनाचं महासंकट आहेच अशा परिस्थितीमध्ये बायो बबल आणि काळजी घेऊन क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजवर कोरोनाचं संकट अधिक गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोच पाठोपाठ खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजपूर्वी मोठी अपडेट येत आहे.
भारता विरूद्ध श्रीलंका सीरिजमधील संकटं संपण्याचं नाव घेत नाहीत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्य आणि कोच पाठोपाठ आता एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना विषाणूमुळे भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक बदलण्यात आलं होतं. पण आता यजमान संघातील एका फलंदाजाला कोरोना मिळाला आहे. या बातमीनंतर भारत-श्रीलंका सीरिजमधील धोका आणखी वाढला आहे.
फलंदाज कोच आणि खेळाडू पॉझिटिव्ह आल्यामुळे काहीशी खळबळ उडाली आहे. तर भारत विरुद्ध श्रीलंका सीरिज रद्द होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नव्या वेळापत्रकानुसार 18 जुलैपासून भारत विरुद्ध श्रीलंका सीरिज होणार आहे.
श्रीलंकेचे खेळाडू सराव न करता मैदानात उतरणार आहेत. सर्व खेळाडूंना सध्या तरी क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. श्रीलंकेचा श्रीलंकाचे बॅटिंग कोच ग्रॅन्ट फ्लॉवर इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली. एका फलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं चिंता वाढली आहे.
18 जुलैपासून या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. वनडे सीरिजमध्ये बदल केल्याने त्याचा थेट परिणाम हा टी 20 सीरिजवरही झाला. 21 जुलैपासून सुरु होणाऱ्या या सीरिजला 4 दिवसांच्या विलंबाने सुरुवात होणार आहे. 25 जुलैपासून या मालिकेचा प्रारंभ होणार आहे.