धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीकडून या खेळाडूकडे दुर्लक्ष, रोहितकडून कॅप्टन होताच संधी

रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटचा कॅप्टन झाला आहे. रोहित श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून (IND vs SL Test Series 2022) रोहितच्या नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे.

Updated: Mar 2, 2022, 03:23 PM IST
धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीकडून या खेळाडूकडे दुर्लक्ष, रोहितकडून कॅप्टन होताच संधी title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटचा कॅप्टन झाला आहे. रोहित श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून (IND vs SL Test Series 2022) रोहितच्या नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे. रोहितने कॅप्टन होताच वनडे आणि टी 20 मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. रोहितने हीच परंपरा कसोटी मालिकेतही कायम राखली. रोहितने या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत अशा खेळाडूला संधी दिली आहे, ज्याकडे माजी कर्णधार विराट कोहलीने वारंवार दुर्लक्ष केलं. (ind vs sl test series team india captain rohit sharma may give chance to chinaman bowler kuldeep yadav in playing eleven) 

टीम इंडिया टी 20 मालिकेनंतर आता 4 मार्चपासून श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये 'कुलचा' जोडीतला स्टार स्पिनर आणि 'चायनामॅन' बॉलर अशी ओळख असलेल्या कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) निवड करण्यात आली. 

धोनीच्या कॅप्टन्सीत बहर

महेंद्रसिंह धोनीच्या कुलदीप यादवची क्रिकेट कारकिर्द चांगलीच बहरली होती. धोनीने कुलदीपला अनेकदा वनडे आणि टी 20 मालिकेतही संधी दिली. कुलदीपने धोनीचा विश्वास सार्थही ठरवला. धोनी आणि कुलदीप ठरवून बॅट्समनला आऊट करायचे. मात्र त्यानंतर धोनीने निवृत्ती घेतली आणि इथूनच कुलदीपच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली.

धोनीनंतर टीमची सूत्र विराटकडे आली. मात्र विराटने धोनीच्या या मर्जीतल्या आणि लाडक्या खेळाडूकडे दुर्लक्ष केलं. कुलदीपची अनेक मालिकांमध्ये निवड करण्यात आली. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये क्वचितच खेळायची संधी मिळाली.

या अशा प्रकारामुळे कुलदीप बाहेर फेकला गेला. कुलदीपची कारकिर्द ऐन भरात असताना संपते की काय, अशी भिती व्यक्त करण्यात आली. मात्र रोहित शर्मा कॅप्टन झाला आणि कुलदीपचं नशीब पालटलं. 

श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून रोहित शर्माच्या कसोटी कर्णधारपदाची सूत्र हाती घेणार आहे. एका बाजूला बीसीसीआयने टेस्ट कॅप्टन म्हणून रोहितच्या नावाची घोषणा केली. तर दुसऱ्या बाजूला 18 सदस्यीय संघात कुलदीपला पुनरागमनाची संधी दिली. 

या कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोहित पहिल्या कसोटीत  कुलदीपला खेळण्याची संधी देऊन त्याचं पुनरागमन करवणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.  

श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.