पोर्ट ऑफ स्पेन : भारताने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा १०५ धावांनी पराभव करून एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायभूमीत सर्वाधिक धावांनी पराभूत करण्याचा भारताकडून हा विक्रम ठरला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत ४३ षटकात ३१० धावा केल्या. पण यजमान संघाला ४३ षटकात सहा विकेट गमावून केवळ २०५ धावा करता आला. वेस्ट इंडिज विरोधात भारताचा त्यांच्या देशात सर्वाधिक धावा राखून मिळविलेला हा मोठा विजय आहे.
यापूर्वी २०१३ मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजला १०२ धावांनी पराभूत केले होते. भारतीय संघ १९८२ -८३ पासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहेत, पण इतक्या मोठ्या धावसंख्येच्या फरकाने पहिल्यांदाच भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले.