IND vs WI 2nd T20 : नाणेफेक जिंकून विंडीजचा गोलंदाजीचा निर्णय, रोहित शर्माने 'या' खेळाडूला दिली संधी

भारतीय संघात कर्णधार रोहित शर्माने एक बदल केला आहे

Updated: Aug 1, 2022, 10:57 PM IST
IND vs WI 2nd T20 : नाणेफेक जिंकून विंडीजचा गोलंदाजीचा निर्णय, रोहित शर्माने 'या' खेळाडूला दिली संधी title=
(फोटो सौजन्य - BCCI)

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs WI) दुसरा सामना वॉर्नर पार्कवर खेळवला जाणार आहे. भा वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना त्याच्या वेळेनुसार 3 तास उशिरा सुरू होत आहे. टीम इंडियाने पहिला सामना ६८ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेतील आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. 

दरम्यान, विंडीज संघात दोन बदल करण्यात आले आहेत. पॉल आणि ब्रूक्सच्या जागी राजा आणि थॉमसला स्थान देण्यात आले आहे. तर रोहित शर्माने एक बदल केला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये रवी बिश्नोईच्या जागी आवेश खानला संधी देण्यात आली आहे. गेल्या सामन्यात भारत तीन फिरकीपटूंसह उतरला होता, त्यामुळे रोहितने दुसऱ्या टी-२०मध्ये एक फिरकी गोलंदाज कमी करून वेगवान गोलंदाजांची संख्या वाढवली आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (क), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (क), रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, डेव्हन थॉमस, जेसन होल्डर, अकील होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅककॉय

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाणार होता, मात्र आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होणार आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 14 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने 6 सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा आहे आणि या दौऱ्यातही टीम इंडिया चांगलीच लयीत दिसत आहे.

दरम्यान हर्षल पटेलला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 साठी सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे.