मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया आज चौथा सामना होत आहे. पावसामुळे सामना सुरू होण्यात मोठा विलंब झाला. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाला बॅटिंग करावी लागणार आहे.
टीम इंडियामध्ये चौथ्या सामन्यासाठी दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात संजू सॅमसन आणि रवि बिश्नोईला संधी देण्यात आली आहे.
रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि हार्दिक पांड्याला या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी टीमची बांधणी करण्याच्या दृष्टीनं रोहित अनेक युवा खेळाडूंना संधी देत आहे.
4TH T20I. India XI: R Sharma (c), R Pant (wk), S Samson, S Yadav, D Hooda, D Karthik, A Patel, B Kumar, R Bishnoi, A Khan, A Singh. https://t.co/HomXIiztTQ #WIvIND
— BCCI (@BCCI) August 6, 2022
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, ऋषभ पंत, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध 5 सामन्यांच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी मिळवली आहे. आजचा सामना जिंकला तर सीरिज जवळपास जिंकल्यात जमा आहे. मात्र आजचा सामना हातून गेला तर कॅप्टन रोहितचं टेन्शन वाढू शकतं.