Ind vs WI ODI : पहिल्या वन डेत मैदानात उतरताच भारतीय संघ रचणार इतिहास

क्रिकेट खेळाची सुरुवात करणाऱ्या साहेबांच्या संघाला न जमलेला विश्वविक्रम भारतीय संघाच्या होणार नावावर

Updated: Feb 3, 2022, 08:13 PM IST
Ind vs WI ODI : पहिल्या वन डेत मैदानात उतरताच भारतीय संघ रचणार इतिहास title=

India Historical ODI : नव्या वर्षात नवी कर्णधारासह नवी सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. २०२२ वर्षातील पहिला सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. 
 
6 फेब्रुवारीला टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना (IND vs WI 1st ODI) खेळेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना होणार आहे. 

हा सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक असणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघानाही न जमलेला विक्रम भारतीय संघाच्या नावावर होणार आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा जेव्हा टॉससाठी मैदानात उतरेल तेव्हा भारतीय संघ इतिहास रचेल.

भारतीय संघासाठी ऐतिहासिक सामना
भारतीय संघ आता पर्यंत 999 एकदिवसीय सामने खेळला असून वेस्टइंडिजविरुद्धचा हा 1 हजारावा (India 1000th ODI) एकदिवसीय सामना असेल. हजार एकदिवसीय सामन्यांचा टप्पा गाठणारा भारत हा क्रिकेट जगतातील पहिला संघ ठरणार आहे. (Team India set to make historic ODI record)

भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या 999 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने 518 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 431 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. 9 मॅच टाय झाल्या, तर 41 सामन्यांचे निकाल लागू शकले नाहीत. भारताच्या विजयाची टक्केवारी 54.54 इतकी आहे.

भारतीय संघानंतर कोणत्या संघाचा नंबर
सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर येतो. ऑस्ट्रेलिया संघ आतापर्यंत ९५८ एकदिवसीय सामने खेळला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान 936 सामने, श्रीलंका 870 सामने आणि वेस्ट इंडिज 834 सामने खेळले आहेत. 

गुजरात क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे तिन्ही सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. त्याच वेळी, पश्चिम बंगाल सरकारने 75 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला आहे. अहमदाबादमध्ये 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय सामन्यानंतर 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला कोलकाता इथं तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.