सुर्याच्या झंझावती शतकापुढे न्यूझीलंडचे पत्ते गार, टीम इंडियाने मिळवला दणदणीत विजय

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे.

Updated: Nov 20, 2022, 04:39 PM IST
सुर्याच्या झंझावती शतकापुढे न्यूझीलंडचे पत्ते गार, टीम इंडियाने मिळवला दणदणीत विजय title=

india beat New Zealand T-20 : भारत आणि न्यूझीलंडमधील (INDvsNZ) दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने 65 धावांनी विजय मिळवला. भारताकडून सुर्यकुमारच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडकडून केन विल्यमसन वगळता मोठी खेळी करता आली नाही. भारतीय वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडचा संघ 126 धावांवर आटोपला. दीपक हुड्डाने सर्वाधिक सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (india beat new zealand second t20 match latest marathi sport news)

टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला होता. भारताकडून सलामीस इशान किशन आणि ऋषभ पंत आले होते. मात्र पंत मोठी खेळी करू शकल नाही 6 धावांवर स्वस्तात परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि किशनने भागीदारी केली.  इशान किशन 36 धावांवर बाद झाला, मात्र त्यानंतर भारताच्या विकेट्स पडत गेल्या. 

न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्रिक घेतली. त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्या 13, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदरला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवलं. सूर्याने एकट्याने एक बाजू लावून धरत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई चालू ठेवली होती. 20 षटकांमध्ये भारताने 192 धावांचं आव्हान दिलं होतं. 

न्यूझीलंड संघाचाही सुरूवात खराब झाली, पहिल्याच षटकामध्ये भुवनेश्वर कुमारने फिन अॅलेनला शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर कॉनवेला वॉशिंग्टनने 25 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. एकीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मैदानावर तग धरून राहिला होता. 52 चेंडूत केनने 61 धावांची खेळी केली मात्र सिराजने त्याला फुलटॉस बॉलवर बाद केलं. 

केन गेल्यावर न्यूझीलंडच्या विकेट्स पडत गेल्या आणि 126 धावांवर पूर्ण संघ ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.