भारताला मिळाला सेहवाग सारखा स्फोटक खेळाडू

भारताला मिळाला आणखी एक धडाकेबाज खेळाडू

Updated: Feb 25, 2020, 01:46 PM IST
भारताला मिळाला सेहवाग सारखा स्फोटक खेळाडू  title=

मुंबई : भारताचा धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या स्फोटक अशा खेळामुळे ओळखला जातो. पहिल्या बॉलपासून सेहवाग मोठे शॉट्स खेळायचा. भारतीय टीमसाठी ओपनिंग करणारा सेहवागने स्फोटक खेळीमुळे चांगल्या चांगल्या गोलंदाजांना पाणी पाजलं होतं. वीरेंद्र सेहवागच्या निवृत्तीनंतर त्याच्या सारखा विस्फोटक खेळाडू भारतीय संघात आलेला नाही. पण एका खेळाडूने आपल्या फलंदाजीने त्यांची पुन्हा आठवण करुन दिली आहे.

भारताच्या महिला संघाला वीरेंद्र सेहवाग सारखा खेळाडू भेटला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महिला संघाला शेफाली वर्माच्या रुपात सेहवाग मिळाला आहे. 16 वर्षाची शेफालीने आपल्या बॅटींगमुळे गोलंदाजांच्या मनात धडकी भरली आहे. टीम इंडियासाठी तिने टी20 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त ओपनिंग केली आहे.

भारतीय महिला टीमची ओपनर शेफाली वर्माने महिला टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 15 बॉलमध्ये 29 रन केले. ज्यामध्ये 5 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या विरुद्ध दुसऱ्या बॉलला तिने सिक्स मारला. शेफालीने 17 बॉलमध्ये 39 रन केले. ज्यामध्ये 2 फोर आणि 4 सिक्सचा समावेश आहे.

शेफाली वर्माची तुलना आता वीरेंद्र सेहवाग सोबत होऊ लागली आहे. वीरेंद्र सेहवाग प्रमानेच शेफाली देखील पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळी करते. सेहवाग प्रमाणाचे जागेवर उभा राहून ती चांगले शॉट्स खेळत आहे. बांगलादेशच्या विरुद्ध शेफाली वर्माने 17 बॉलमध्ये 39 रन केल्याने ती प्लेयर ऑफ द मॅच ठरली. 

सामन्यानंतर भारतीय टीमची फास्ट बॉलर शिखा पांडेने शेफाली बाबत एक खुलासा केला आहे. टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीचा तिने खुलासा केला. 'टीमने शेफालीला आपला खेळ बदलण्यासाठी सांगितलेलं नाही. तिला आक्रमक खेळीसाठी पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.' सेहवागला देखील आक्रमक खेळीसाठी सूट दिली जायची.