भारत - पाकिस्तान सामना : मास्टर ब्लास्टर देणार आनंदाचा धक्का?

तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल किंवा नसाल... पण, रविवारी म्हणजेच ४ जून रोजी नियोजित भारत - पाकिस्तान सामन्यासाठी नक्कीच उत्सुक असाल... याच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना आणखीन एक आनंदाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 3, 2017, 10:18 AM IST
भारत - पाकिस्तान सामना : मास्टर ब्लास्टर देणार आनंदाचा धक्का? title=

मुंबई : तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल किंवा नसाल... पण, रविवारी म्हणजेच ४ जून रोजी नियोजित भारत - पाकिस्तान सामन्यासाठी नक्कीच उत्सुक असाल... याच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना आणखीन एक आनंदाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

या मॅच दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कमेंट्री करताना दिसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय. तसं पाहिलं तर आपल्या फॅन्सना भेटण्याचे वेगवेगळे फंडे निवृत्तीनंतरही सचिन शोधून काढतोय... त्यामुळे ही शक्यताही नाकारता येत नाहीय. 

या मॅचमध्ये सचिन कमेंट्रीच्या क्षेत्रात डेब्यु करू शकतो. रविवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात सचिनचा स्टार स्पोर्टस पॅनलमध्ये सहभाग असेल, असं सांगितलं जातंय. यासाठी सचिन तेंडुलकरनं या मॅचसाठी स्टार स्पोर्टस चॅनलशी करार केल्याचं 'मुंबई मिरर'नं म्हटलंय. क्रिकेटच्या माजी दिग्गजांसोबत त्याची ही जुगलबंदी पाहण्यास प्रेक्षकही नक्कीच उत्सुक असतील, यात शंकाच नाही.