इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Jul 18, 2018, 03:28 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा  title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. पाच टेस्ट मॅचची ही सीरिज असली तरी पहिल्या तीन टेस्टसाठीच भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये ऋषभ पंत, करुण नायर आणि शार्दुल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. दुखापत झाल्यामुळे ऋद्धीमान सहाला टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. तर रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमारही या टीममध्ये नाहीत. टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कुलदीप यादवला टेस्ट सीरिजमध्येही घेण्यात आलं आहे.

पहिल्या तीन टेस्टसाठी भारतीय टीम 

विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर