मुंबई: टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. तर 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज खेळवली जाणार आहे. या दोन्ही सामन्यांपूर्वी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांना धक्का बसला आहे. इंग्लंड संघातील एक खेळाडू दुखापत झाल्यानं तर न्यूझीलंड संघातील खेळाडू काही वैयक्तीक कारणांमुळे इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळू शकणार नाही.
इंग्लंड संघात सोमवारी सरावा दरम्यान कर्णधार जो रूटच्या हाताला दुखापत झाली. उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे इंग्लंड संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 48 तासांत न्यूझीलंड विरुद्ध सामना खेळायचा असताना जो रूटच्या हाताला दुखापत झाली आहे.
Our latest @NBCricket training kit on view at Lord's today pic.twitter.com/YzILe3Qm6Z
— England Cricket (@englandcricket) May 31, 2021
जो रूटला दुखापत झाल्यानंतर त्याने मैदान सोडलं. आता तो इंग्लंड विरुद्ध सीरिज खेळणार की नाही याबाबत शंका आहे. जर जो रुट खेळला नाही तर इंग्लंडकडून सॅम बिलिंग्स इंग्लंडच्या टीमचं नेतृत्व करणार आहे.
दुसरीकडे न्यूझीलंड संघातील स्टार खेळाडू ट्रेन्ट बोल्ट इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमध्ये भाग घेणार नाही. यामागचं कारण सांगताना त्याला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी सराव करायला वेळ हवा असल्यानं त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. बोल्ट न्यूझीलंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे.