IND vs AUS 1st T20 : मोहालीच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित, 13 वर्ष झाली पण...

India Vs Aus पहिला सामना 20 ऑक्टोबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळला जाणार.

Updated: Sep 19, 2022, 08:08 PM IST
IND vs AUS 1st T20 : मोहालीच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित, 13 वर्ष झाली पण... title=

India Vs Aus : आगामी T20 World Cup च्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये T-20 मालिका आयोजित करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील T-20 मालिका भारतीय संघासाठी ही लिटमस टेस्ट असेल. दोन्ही संघात 3  टी-ट्वेंटी सामने खेळले जातील. या मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी मोहालीच्या मैदानावर (India Vs Aus 1st T 20 Match) खेळला जाणार आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्या जागी उमेश यादवला (Umesh Yadav) संघात स्थान देण्यात आलंय. त्याचबरोबर हर्षल पटेलला देखील संधी देण्यात आल्याने भारतीय गोलंदाजी आणखी मजबूत झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच उद्याच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) विजय निश्चित मानला जात आहे. त्याला कारण देखील खास आहे.

मोहालीच्या मैदानावर भारतच जिंकणार

मागील अनेक वर्षापासून मोहालीचं मैदान भारतासाठी खास राहिलंय. भारतीय संघ मोहालीच्या मैदानावर आत्तापर्यंत अजय राहिला आहे. टीम इंडिया मोहालीमध्ये एकही टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला नाही. टीम इंडियाने मोहालीच्या मैदानावर 3 टी -ट्वेंटी सामने खेळले असून तिन्ही सामन्यात भारताला विजय मिळाला. 

2009 साली खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. तर 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पाणी पाजलं होतं. त्याचबरोबर 2019 साली साऊथ अफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने साऊथ अफ्रिकेचा दारूण पराभव देखील केला होता.

टीम इंडिया अव्वल -

India Vs Aus मध्ये आत्तापर्यंत 23 टी-ट्वेंटी सामने खेळले गेले, ज्यामध्ये भारताला 13 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 9 सामन्यात ऑस्ट्रेलिया सरस राहिली. मागील काही सामने पाहता रोहित सेना काँगारूंवर भारी पडु शकते.

भारतात खेळलेल्या गेलेल्या सामन्यात देखील भारताने बाजी मारल्याचं पहायला मिळतं. भारतात India Vs Aus मध्ये झालेल्या 7 सामन्यात भारताला 4 वेळा विजय मिळवता आलाय. सध्या विराट कोहली फॉर्ममध्ये असल्याने भारतीय संघाची ताकद दुपटीने वाढलीये तर विराटची बॅट ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच आग ओकताना दिसते.

Australia विरुद्ध Team India

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराह.