IND vs AUS, 1st Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (Border-Gavaskar Trophy 2023) पहिला सामना नागपुरात खेळवला जात असून सामन्याचा आज तिसरा दिवस. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 400 धावा केल्या आहेत. या सामन्यात कांगारूंचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. जडेजाने पाच आणि अश्विनने तीन बळी घेतले.
दरम्यान भारताची सुरूवातीला कामगिरी उत्तम दिसली असून भारताकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शतक झळकावले. यानंतर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. मात्र र ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने तब्बल 7 विकेट्स घेत सर्वांचच लक्ष्य वेधून घेतलं. आता 223 धावांची पिछाडी घेऊन ऑस्ट्रेलिया दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे.
वाचा : भारत-ऑस्ट्रेलियाला सामन्यासंदर्भात मोठी अपडेट, तिसर्या कसोटी सामना...
तसेच भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव संपवला. अक्षर पटेलने 174 चेंडूत 84 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अक्षरचे शतक हुकले, पण त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने 223 धावांची आघाडी घेतली. नागपूरच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळत असून ही आघाडी निर्णायक ठरू शकते. भारताचा डाव संपल्यानंतर पंचांनी लंचची घोषणा केली आहे.